Press "Enter" to skip to content

पोलादपूर आणि महाड शहरामध्ये 14 ऑगस्टला रानभाजी महोत्सव

सिटी बेल लाइव्ह / पोलादपूर (शैलेश पालकर)-

श्रावण महिन्यांच्या व्रत आणि उपवास काळामध्ये मोठया प्रमाणामध्ये ग्रामीण भागातील रानभाज्यांची आवक शहरी भागामध्ये होत असून या पार्श्वभूमीवर महाड उपविभागीय कृषी अधिकारी साळवे यांनी महाड आणि पोलादपूर शहरांमध्ये रानभाजी महोत्सवाचे आयोजन येत्या शुक्रवार, दि.14 ऑंगस्ट 2020 रोजी सकाळी 9 वाजता पोलादपूर एस.टी.बसस्थानक आणि महाड येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित केले आहे.

यावेळी भाजीपाल्याची रोपे व बियाणांची शेतकऱ्यांना अल्पदरामध्ये विक्री करण्यात येणार असून ग्रामीण भागातील शेतकरी रानभाज्या विक्रीसाठी घेऊन येणार आहेत. महाड व पोलादपूरवासियांनी या रानभाजी महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन महाड व पोलादपूर तालुका कृषी कार्यालयांतर्फे करण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.