कामांवर रुजू होताच प्रशांत तायडे व सहकाऱ्यांनकडून पुष्पवृष्टीने जोरदार स्वागत

सिटी बेल लाइव्ह / कोलाड ( कल्पेश पवार )
कोलाड पोलीस स्टेशन मधील चार पोलीस योद्धा कोरोनावर मात करून आपल्या कर्तव्यावर पुन्हा हजर होताच,कोलाड पोलीस निरीक्षक प्रशांत तायडे व सर्व कर्मचारी यांनी त्यांचे पुष्पवृष्टीने जोरदार स्वागत करून शुभेच्छा दिल्या आहेत.
कोविड -19 या आजाराने जगभर थैमान घातले आहे.या रोगाची झळ सर्वसामान्य जनतेला बसू नये यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता दिवसरात्र मेहनत घेऊन जनतेला या विषाणूची लागण होऊ म्हणून कर्तव्य पार करीत असतांना कोलाड पोलिस स्टेशनमधील एन.जी पवार,पी जी पाटील,ई एस सय्यद,ए बी पाटील,या चार पोलिस योद्धा ना कोरोनाची लागण झाली होती.हे चारी योद्धा कोरोनावर मात करून आपल्या कर्तव्यावर पुन्हा हजर होताच त्यांचे पोलीस निरीक्षक प्रशांत तायडे,ठोबरे,माने,जाधव,पाटील, विघ्ने,तडवी, तावडे,महाडिक,लंजारे , बाकडे या सर्व सहकाऱ्यांनकडून त्यांचे पुष्पवृष्टीने जोरदार स्वागत करण्यात आले आहे.






Be First to Comment