महाड व तळासाठीही निधी- आमदार भरत गोगावले यांचे प्रयत्न
सिटी बेल लाइव्ह / पोलादपूर (शैलेश पालकर)-
महाड विधानसभा मतदार संघाचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रयत्नांतून दक्षिण रायगड जिल्ह्यातील पोलादपूरसह तळा नगरपंचायत आणि महाड नगरपालिकेसाठी निधी आणण्यात यश आले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
पोलादपूर नगरपंचायतीसाठी 3 कोटीचा निधी उपलब्ध करण्यात यश आल्याने आगामी दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर नगरपंचायत हद्दीमध्ये मोठया प्रमाणात विकासकामे होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
राज्याचे नगरविकासमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे आ.गोगावले यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार आणि पाठपुरावा केल्यामुळे अनेक विकासकामांना मंजुरी मिळविण्यात यश आले आहे. महाड नगरपलिकेसाठी 4 कोटी 47 लक्ष, पोलादपूर नगरपंचायतीसाठी 3 कोटी, तळा नगरपंचायतीसाठी 1 कोटी असा विकासनिधी आ.गोगावले यांच्या पाठपुराव्यामुळे राज्याच्या नगरविकास मंत्रालयाने मंजूर केला आहे. आ.गोगावले यांच्या या यशस्वी प्रयत्नांबद्दल महाड, पोलादपूर व तळा येथील नगरसेवक आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.






Be First to Comment