सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम )
रोहा तालुक्यातील कोलाड वरसगाव नाका येथील रहिवाशी इरिकेशन विभागातून सेवा निवृत्त झालेले तसेच नामवंत सर्वेयर दिलीप शिंदे यांच्या मातोश्री श्रीमती लिलावती दौलतराव शिंदे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.मृत्यूसमयी त्या ८५ वर्षाच्या होत्या.
श्रीमती लीलावती शिंदे यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ आणि मनमिळाऊ होता तसेच त्या सर्वांच्या परोपकारी पडणाऱ्या लीलावती सर्वांना सुपरिचित होत्या.एक दीड वर्षांपूर्वीच त्यांचे पती दौलतराव शिंदे यांचे निधन झाले तद्नंतर काही कालावधीनंतर नुकत्याच त्या अल्पशा आजाराने देवाज्ञा झाली.
त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार करून घडविल उच्च पदीस्थ कार्यरत राहून आपआपल्या कुटूंबाचा संभाळ करत आहेत .
त्यांच्या अंत्यविधीसाठी कोरोना विषाणु प्रादुर्भावामुळे आप्तेष्ट व मोजकेच नागरिक उपस्थित होते.परंतु त्यांच्या निधनाची वार्ता समजतात मोबाईलवरुन असंख्य नागरिकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली व कोलाड वरसगाव येथील वैकुंठ धाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन मुली,सुना, नातवंडे व मोठा शिंदे परिवार आहे.
त्यांचा दशक्रिया विधी शुक्रवार दि.१४ऑगस्ट रोजी तर उत्तरकार्य विधी रविवार दि.१६ऑगस्ट २०२० रोजी त्यांच्या रहात्या निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या कुटूंबियांकडून प्राप्त झाली आहे,






Be First to Comment