Press "Enter" to skip to content

कर्जत तहसील म्हणते सरकारी काम आणि सहा महिने थांब

कर्जत तहसील कार्यालयाच्या ढोबळ कामामुळे नुकसानग्रस्त शेतकरी अद्यापी भरपाईच्या प्रतीक्षेत !

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –

सरकारी काम , आणि सहा महिने थांब , अशी शासकीय बाबूंची काम करण्याची पद्धत युगानुयुगे चालत आली असून
या कारभाराची आत्ता शंभरी भरलेली दिसत असताना सुदर्शन घेऊन कृष्णरूपी संतापलेला शेतकरी त्यांच्या छाताडावर नाचून शीर कलाम करण्यासाठी रस्त्यावर उतरलेला कर्जतमध्ये दिसत आहे .

तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी , अवकाळी पाऊस , तर निसर्ग चक्रीवादळामुळे देशोधडीस लागलेल्या शेतकऱ्यांना कर्जत तहसील कार्यालयाच्या त्याचप्रमाणे बँकांच्या दळभद्री कामामुळे अजून रसातळाला नेण्याची व्यूहरचना येथील यंत्रणेने केलेली असून नुकसानभरपाई त्वरित न मिळाल्यास या विरोधात तहसील कार्यालयाच्या ढोबळ कारभारा विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धार कर्जत तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतक-यांनी कर्जत तहसील कार्यालयास निवेदन देऊन केले आहे .

कर्जत तालुक्यात माहे जुलै २०१९ मध्ये जोरदार अतिवृष्टी झाल्याने येथील शेतकऱ्यांचे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तर माहे नोव्हेंबर २०१९ ला अवकाळी पाऊस पडल्याने तयार झालेले शेत खराब झाल्याने शेतक-यांचे मोठया प्रमाणात नुकसान होऊन कर्जबाजारी होण्याची परिस्थिती ओढावली होती . राज्या बरोबरच कर्जत तालुक्यात कोरोना विषाणू महामारीचे संकट आले त्याला शेतकरी बांधव शासन – प्रशासनाच्या सुचनेचे गप्प – गुमान पालन करत असताना मेटाकुटीस आला होता , तर त्यातच ३ जून २०२० रोजी निसर्ग चक्रीवादळाने शेतकऱ्यांचे जनजीवन उध्वस्त करून प्रचंड नुकसान झाले .

या सर्व बाबींचा शासन – प्रशासनाने पंचनामे स्थानिक तलाठी व कृषी खात्याच्या अधिका-यांनी वेळेवर केले मात्र अद्यापपर्यंत अनेक शेतकऱ्यांना या नुकसानीची नुकसान भरपाई फुटी कवडी देखील मिळाली नसल्याचा आकांत व संताप शेतकरी करीत आहेत .
याबाबतीत उदासीन कर्जत तहसील कार्यालयात वेळोवेळी विचारणा करूनही हे सरकारी बाबू या महत्वपूर्ण बाबींकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत . तर तहसीलदार यांचे देखील या कामावर अंकुश नसल्याचे दिसून येत आहे . शासनाकडून नुकसानीची भरपाई देण्यात आली असताना कर्जत तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात अजून रक्कम का आली नाही , असा संतप्त सवाल शेतकरी करत असून याबाबतीत १५ ऑगस्ट २०२० पर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. अशा विषयीचे निवेदन कर्जत तहसील कार्यालयात दिले आहे .

यावेळी पोलीस मित्र संघटना रायगड जिल्हा उपाध्यक्ष दशरथ मुने , जिल्हा महासचिव रमेश कदम , तालुका अध्यक्ष उत्तम ठोंबरे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत मांडे , निलिकेश दळवी , अजित पाटील साईनाथ मुने , जगदीश मुने , प्रकाश दळवी , हरेश सोनावळे आदि शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.