Press "Enter" to skip to content

चाकरमान्यांना गावाकडे रोजगार निर्मितीसाठी स्वदेस फाऊंडेशनतर्फे रिव्हर्स मायग्रेशन स्किम

औसिटी बेल लाइव्ह / पोलादपूर (शैलेश पालकर)-

रायगड जिल्ह्यातील माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, महाड ,पोलादपूर आणि सुधागड या तालुक्यांमध्ये गावांमधून मुंबईला स्थायिक झालेले व गावाला परत येण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी स्वदेस फाऊंडेशनतर्फे रिव्हर्स मायग्रेशन ही स्कीम सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती स्वदेसचे प्रकल्प महाव्यवस्थापक तुषार इनामदार यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस दिली.

महात्मा गांधी यांनी खेडयाकडे चला अशी हाक देऊन देशाच्या सर्वांगिण विकासाचा संदेश दिला असताना गेल्या अनेक वर्षांपासून कोकणात मात्र विरोधाभास दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या तीन वर्षांपासून स्वदेस फाऊंडेशनमार्फत शहराकडून गावाकडे स्थलांतर करणाऱ्यांसाठी गावाकडेच रोजगारनिर्मितीचे प्रयत्न केले गेले आहेत. याअंतर्गत आतापर्यंत 125 हून अधिक ग्रामस्थांनी आपल्या कुटुंबासह मुंबईहून गावाला परत येऊन वेगवेगळया प्रकारचे उद्योग सुरू केले आहेत.

स्वदेस फाउंडेशन काम करीत असलेल्या माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर आणि सुधागड या सात तालुक्यातील 18 ते 45 या वयोगटातील ग्रामस्थ मुंबई-पुणे व इतर शहरामधून लॉकडाऊन दरम्यान गावाला आले आहेत व पुन्हा पुणे-मुंबई शहरांमध्ये परत जाण्याऐवजी गावातच स्वत:चा उद्योग-व्यवसाय करू इच्छितात, अशांनी स्वदेस फाउंडेशन व्यवस्थापक संतोष जाधव- 9821612298, राजेंद्र होनमाने 918652320523 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी स्वदेसचे प्रकल्प महाव्यवस्थापक तुषार इनामदार यांनी सांगितले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.