Press "Enter" to skip to content

कोयना प्रकल्पग्रस्त जनतेच्या समस्येसाठी बैठकीचे आयोजन

सिटी बेल लाइव्ह / रसायनी-राकेश खराडे #

कोयना प्रकल्पामुळे निर्वासित झालेल्या व रायगड जिल्ह्यात स्वतः पुनर्वसन झालेल्या कोयना प्रकल्पग्रस्त जनतेच्या न्याय मागण्या व नागरी सुविधा साठी लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येईल असे आश्वासन पालकमंत्री आदितीताई तटकरे यांनी दिले आहे.

रायगड च्या पालकमंत्री आदितीताई तटकरे यांनी नुकतीच खालापूर येथील कोविड-१९ या केंद्राला भेट देऊन पहाणी केली.यावेळी अखिल कोयना पुनर्वसाहत सेवा संघ चे सरचिटणीस अर्जुन बळीरामराव कदम यांनी भेट घेऊन निवेदन सादर केले व चर्चा केली,आपण लवकरच या बाबतीत संबंधित विषयाचे खातेप्रमुख यांच्याशी चर्चा करून  या सर्व समस्या मार्गी लावण्यासाठी बैठक घेऊ असे आश्वासन दिले.

खालापूर,पेण,पनवेल,रोहा व माणगाव या तालुक्यात वसाहती आहेत.यावेळी माजी आमदार सुरेशभाऊ लाड उपस्थित होते.त्याचप्रमाणे ठाणे,पालघर,रत्नागिरी व सातारा जिल्ह्यातील कोयना प्रकल्पग्रस्त जनतेच्या न्याय मागण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा करू असे अश्वाशीत केले.

सातारा जिल्ह्यातील कोयना जलविद्युत प्रकल्पासाठी अनेक गावे उठवण्यात आली,ही गावे रायगड,ठाणे, पालघर, रत्नागिरी,सोलापूर व काही सातारा जिल्ह्यात स्थायिक झाले,मात्र शासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता आजही झालेली नाही.

अनेक गावे मूलभूत सुविधानिर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत,तर अनेक खातेदार यांना पर्यायी जमीन मिळाली नाही.तर काही खातेदार यांची फसवणूक झालेली आहे.मूळ खातेदार अथवा त्यांच्या वारसांना दलाल लोकानी फसविले असून नविमुंबई येथिल खारघर हा नमुना असून कोटयवधी रुपयांची जमीन कवडीमोल किमतीने खातेदार यांच्याकडून घेण्यात आली आहे.तर खातेदार यांनी पसंती करून मागणी केलेल्या जमीनी देण्याचे दूरच त्यांचे प्रस्ताव देखील धूळखात पडून आहेत.मात्र दलाल यांच्याकडून गेलेले प्रस्ताव मंजूर करण्यात येतात असा अनुभव आहे.

खारघर जमीन प्रस्ताव त्वरित मंजूर करणाऱ्या अधिकारी यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.सन १९९२ व त्यांनतर काही खातेदारांना सोलापूर जिल्ह्यात जमीन देण्यात आली होती,ते प्रस्ताव रद्द करून रहात असलेल्या जिल्ह्यातच पर्यायी जमीन मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.