सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :
जून महिन्यात निसर्ग चक्रीवादळा मुळे नागोठणे शहरातील केएमजी (कुंभारआळी, मराठाआळी व गवळआळी ) विभागातील दोन स्मशानभूमीच्या पत्र्याची शेड उडाल्यामुळे मृत व्यक्तीचा अंत्यविधी भर पावसातच करावा लागत असल्यामुळे लवकरात लवकर त्या दोन्ही स्मशानभूमीतील शेड उभारून द्याव्यात अशी मागणी नागोठणे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष दिनेश घाग व राष्ट्वादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेचे रोहा तालुका अध्यक्ष अक्षय नागोठणेकर यांनी ग्रामपंचायतीकडे एका निवेदनाच्या वतीने केली आहे.
या निवेदनाची दखल घेत दोन्ही स्मशानभूमीच्या शेडचे काम लवकरात लवकर केले जाईल अशी ग्वाही नागोठण्याचे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस कडून देण्यात आलेल्या निवेदनात घाग व अक्षय नागोठणेकर यांनी म्हटले आहे की, ३ जून रोजी निसर्ग चक्रीवादळामुळे नागोठणे शहरातील केएमजी विभागातील दोन स्मशानभूमी शेड पूर्णतः उध्वस्त झालेल्या असल्यामुळे गेल्या आठवड्यात या विभागातील दोन मृत व्यक्तींचा अंत्यविधी उघड्या स्मशानभूमीत भर पावसात करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली होती. तरी यापुढे पुन्हा अशी वेळ येऊ नये म्हणून सदरील स्मशानभूमीच्या शेडचे काम लवकरात लवकर करावे अशी विनंती ग्रामपंचायतीस निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.






Be First to Comment