सिटी बेल लाइव्ह / माथेरान (मुकुंदरांजाणे )
माथेरानमधील पर्यटन मार्च महिन्यापासून बंद झाल्यानंतर येथील स्थानिकांची रोजीरोटीच बंद झाली होती सुरवातीस अनेकांनी धान्य वाटप करून मदत केली पण ऐन गणपती आगमना अगोदर रा.स्व.संघ जनकल्याण समिती च्या पर्यटनातून माथेरानमधील चारशे कुटुंबाना धान्य वाटप करण्यात आले .
माथेरान मधील पर्यटन व्यवसाय बंद झाल्यानंतर हातावर पोट असलेल्या मजूर वर्ग व मध्यमवर्गीयांची परिस्थिती हलाकीची झाली होती अशावेळी अनेक सामाजिक संस्था व माथेरानप्रेमींनी येथील नागरिकांना विविध स्वरूपात मदत केली व अशावेळी अनेक पर्यटक व माथेरानप्रेमीही मदत कर्त्याच्या स्वरूपात समोर आलेले माथेरानकरांनी पाहिले.
ह्याचवेळी माथेरानमधील भूमिपुत्र श्री वैभव घोणे यांनी पुणे येथील आपल्या मित्रांना माथेरानमधील समस्या सांगितल्या होत्या व त्यांनी माथेरानकरांना धान्य स्वरूपात मदत देण्याचा निश्चय केला. ह्यामध्ये रा.स्व.संघाचे पुण्यातील कार्यकर्ते शैलेंद्र बोरकर,डोंबिवली येथील श्री प्रमोद क्षीरसागर,प्रसन्न खेडकर यांनी महत्वाची भूमिका बजावली व माथेरानयेथील कार्यकर्त्यांनी आज माथेरानमधील गरजू कुटुंबाना धान्य वाटप केले.






Be First to Comment