आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्याच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रमासह स्पोर्ट्स ऍकेडमी ची स्थापना
सिटी बेल लाइव्ह / उरण (विठ्ठल ममताबादे )
आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त संघटनेतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष रुपेश मच्छिंद्रनाथ धुमाळ व कार्याध्यक्ष गौरव अरुण म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आगरी कोळी कराडी समाजातील रायगड, ठाणे, पालघर मुंबई येथील हजारोच्या संख्येने समाज संघटित होत असताना संघटनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून पद नियुक्ती करण्यात आली.
आगरी कोळी कराडी समाजातील रायगड ठाणे मधील 95 गावाबरोबरच रायगड ठाणे पालघर मुंबई येथील भूमीपुत्रांच्या पिकत्या जमिनी राहती घरे देशाच्या विकासाच्या नावावर घेऊन या समाजाला १००% भूमिहीन केलं जात आहे. समाजात आपले अस्तित्व टिकून रहावा येथे येणाऱ्या रोजगार, नोकऱ्या, उद्योगधंदे या सर्वांमधे इथल्या भूमीपुत्रांना प्राधान्य मिळावा म्हणून समाजातील तरुण हे आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या एका झेंड्याखाली येऊन मोठ्या प्रमाणात तरूण संघटित होऊन “ध्यास समाज्याच्या अस्तित्वाचा” हा ब्रीद वाक्य मनाशी बाळगून समाजासाठी काम करत आहेत.
संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त संघटनेच्या उपाध्यक्षपदी रिटघर गावातील माजी सरपंच भारत सुभाष भोपी यांची निवड करण्यात आली. तसेच सचिव पदी जांभूळपाडा गावातील विश्राम मोहिते, खजिनदारपदी धुतुम गावातील नंदेश ठाकूर, सहसचिवपदी वहाल गावातील मंगेश दापोळकर, सहखजिनदार पदी कोंबडभुजे गावातील राहुल कोळी, सहखजिनदार पदी कलंबोली गावातील कुणाल भगत, प्रसिद्धी प्रमुख पदी चिरनेर गावातील करण नारंगिकर, सल्लागारपदी चुनाभट्टी(मुंबई) येथील धीरज कालेकर, कायदेशीर सल्लागार वरचे ओवले गावातील ऍड. वंदन घरत, संघटनेचे प्रवक्ता कोपर गावातील किरण पवार,
उद्योजक व रोजगार विभाग अध्यक्षपदी माणघर गावचे रोहन पाटील यांची निवड करण्यात आली.
याच बरोबर पनवेल तालुका अध्यक्षपदी युवा शिवव्याख्याते नितळस गावातील विवेक भोपी, उरण तालुका अध्यक्षपदी वशेणी गावातील विशाल पाटील, उलवे नोड अध्यक्षपदी गव्हाण गावातील आकाश कोळी, कर्नाळा विभाग अध्यक्षपदी शिरढोन गावातील रोशन पवार, नेरे विभाग अध्यक्षपदी कोप्रोली गावातील प्रदीप पाटील, खारघर विभाग अध्यक्षपदी वहाल गावातील मंगेश म्हात्रे, करंजाडे विभाग अध्यक्षपदी चिंचपाडा गावचे निखिल भोपी, वावंजे विभाग अध्यक्ष खेरणे गावातील प्रमेय फडके, तळोजा विभाग अध्यक्षपदी पडघे गावातील नितीन भोईर, कामोठे शहराध्यक्षपदी कामोठे गावातील वृषभ गोंधली, पनवेल तालुका पत्रकार विभाग अध्यक्षपदी पडघे गावातील गोविंद जोशी, पनवेल तालुका सल्लागारपदी कसळखंड गावचे रवी घरत याच बरोबर उरण तालुका तालुक्यात चिरनेर विभाग अध्यक्षपदी चिरनेर गावातील महेश पाटील, जासई विभाग अध्यक्ष पदी दिघोडे गावातील देवेंद्र गोवारी,चाणजे विभाग अध्यक्षपदी मुळेखंड गावचे सुमित थळे , उरण तालुका सल्लागारपदी जसकार गावातील समीर ठाकूर, पनवेल तालुका सल्लागारपदी बामणडोंगरी येथील राजेंद्र म्हात्रे यांची निवड करण्यात आले आहे. तसेच उरण तालुका पत्रकार विभाग अध्यक्ष मोठे भोम येथील संग्राम ठाकूर, उरण तालुका कार्याध्यक्षपदी पिरकोण गावातील चेतन गावंड, यांची निवड व अनुशक्ती नगर मानखुर्द(मुंबई) विभाग अध्यक्ष पदी सुरेंद्र पाटील यांची निवड करण्यात आली. व इतर सदस्यांची नोंदणी यावेळी करण्यात आली.यावेळी नवनियुक्त पदाधिकारी व सदस्यांना नियुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात आले.
संघटनेच्या वर्धापन दिनी समाजा सोबतच देशप्रेमाची भावना बाळगत संस्थे तर्फे रायगड जिल्हा परिषद शाळा प्लॉट नंबर 17, R-2, नवीन पुनर्वसन करंजाडे नोड, पनवेल येथे सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिराला लॉकडाऊन काळात सुद्धा उत्तम प्रतिसाद मिळाला असून या रक्तदान शिबिरात एकूण 68 जणांनी रक्तदान केले.यावेळी संस्थेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. यावेळी हा उपक्रम शासनाच्या नियमा नुसार सोशल व फिजिकल डिस्टन्सचे नियम पाळून आयोजित करण्यात आला.
समाज प्रेमापोटी समाजातील तरुण अभ्यासासोबतच क्रीडा क्षेत्रात देखील गुणवंत असला पाहिजे यासाठी आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य याच्या अंतर्गत वर्धापन दिनाचे औचित्य साधून आगरी कोळी कराडी स्पोर्टस् अकॅडमीचे उद्घाटन क्रीडा प्रशिक्षक ल.ह.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. उरण- पनवेल तालुक्या बरोबरच येणाऱ्या पुढील काळात रायगड, मुंबई ,येथील तालुकाप्रमुख, शहर प्रमुख , विभाग प्रमुख, शाखाप्रमुख या पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत.










Be First to Comment