सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर)
नगरपंचायत खालापूर हद्दीतील स्मशानभूमीत चोरांचा वावर वाढला असून चोरानी गेले तीन महिन्यापासून स्मशानभूमीतील विद्युत बल्ब चोरीचा धङाका लावला आहे.
रविवारी राञी खालापूरात एका महिलेचे अकस्मात निधन झाले.अंत्यविधीसाठी असलेले नियमावाली यामुळे जवळचे नातेवाईकांच्या उपस्थितीत राञीच अंत्यसंस्कार करायचे ठरले.त्यासाठी खालापूरातील तरूण मंङळी मदतीसाठी सरसावली.पुढील तयारिसाठी स्मशानभूमीत गेल्यानंतर स्मशानभूमी पूर्ण अंधारात होती.स्मशानभूमी परिसराती विद्युत दिवे चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार खालापूरातील तरूण राकेश गव्हाणकर आणि विशाल ऊशीरे यांच्या लक्षात आला.राञीच अंत्यसंस्कार करायचे असल्याने पर्यायी व्यवस्थेची जुळवाजुळव सुरू झाली.नगरसेवक संतोष जंगम यानी तातङीने घरी असलेला हॅलोजन उपलब्ध करून दिला.काळोखात राकेश आणि विशाल यानी पर्यायी व्यवस्था केल्याने स्मशानभूमी उजळली आणि पुढील अंत्यविधी पार पङले.
खांबावर चढून बल्ब चोरी केले जात आहेत सातत्याने तीन वेळा असे प्रकार घङले आहेत.
संतोष जंगम-
नगरसेवक खालापूर नगरपंचायत






Be First to Comment