पाली ग्रामपंचायत आणि कोरोना सनियंत्रण व दक्षता समितीतर्फे नियमावली जाहीर..!
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)
दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सवात चाकरमान्यांनी पाली सुधागडात येण्याची तयारी दर्शवली आहे. अशातच कोरोनाच्या पाश्वभूमीवर गणेशोत्सवानिमित्त पालीत येणाऱ्या चाकरमान्यांसाठी ग्रुप ग्रामपंचायत पाली व कोरोना सनियंत्रण व दक्षता समितीने सर्व गणेशभक्त व चाकरमान्यांना आवाहन केले आहे.
गणेशोत्सवानिमित्त येणाऱ्या चाकरमान्यांसाठी नियमावली पुढील प्रमाणे असणार आहे.
आपण गणेशोत्सव करिता गावी येणार असाल तर शुक्रवार दिनांक 12 तारखेपूर्वी गावाकडे येऊन 10 दिवसांकरिता होमक्वारंटाईन राहणे बंधनकारक आहे. गावाकडे होमक्वारंटाईन काळात शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. संसर्गाचा धोका लक्षात घेता पूर्वकल्पना देत आहोत. आपल्या गावातील लहान मुले व वृद्ध नागरिकांची काळजी पोटी हा निर्णय घेण्यात आला आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. आपल्या गावी राहणाऱ्या कुटुंबांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी आपण दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन कराल हा विश्वास आहे शासनाने यात काही बदल केल्यास वरील नियम शिथिल होऊ शकतात.
चाकरमान्यांनी गाव कोरोना मुक्त रहावे यासाठी सहकार्य करावे असे आवाहन पाली ग्रामपंचायत सरपंच गणेश बाळके तथा अध्यक्ष कोरोना सनियंत्रण व दक्षता समिती यांनी केले आहे.






Be First to Comment