
पनवेल दि.०८ (संजय कदम) : पनवेल शहरासह तुर्भे व सीबीडी परिसरातुन मोटारसायकली चोरणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे.
पनवेल परिसरातून ३ मोटारसायकली तसेच तुर्भे व सीबीडी परिसरातुन मोटारसायकल चोरीस गेल्याची घटना घडली. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. विनोद लभडे, पोहवा नितीन वाघमारे, पोहवा अविनाश गंथडे, पोहवा अमोल डोईफोडे, पोहवा परेश म्हात्रे, पोहवा महेंद्र वायकर, पोना विनोद देशमुख, पोशि चंद्रशेखर चौधरी आदींच्या पथकाने गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे सराईत आरोपी अजयलाल कौल (वय ३० वर्षे, रा. करंजाडे) याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून १ लाख ५ हजार रुपये किमतीच्या ५ मोटारसायकल हस्तगत केले. याच्या अटकेमुळे इतरही वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.




Be First to Comment