Press "Enter" to skip to content

खारघर मध्ये विसर्जनाकरीता कृत्रिम तलाव निर्माण करा : शिवसेनेची मागणी

 सिटी बेल लाइव्ह / पनवेल (वार्ताहर)

खारघर विभागामध्ये गणपती विसर्जनाकरीता कृत्रिम तलाव निर्माण करण्याची मागणी शिवसेनेने पनवेल महानगरपालीका शहर अभियंता संजय कटेकर यांच्याकडे केली आहे. 

शिवसेना पनवेल तालुका उपमहानगरसंघटक गुरूनाथ पाटील यांनी पनवेल महानगरपालिका शहर अभियंता संजय कटेकर यांची भेट घेऊन येत्या काही दिवसात गणपती उत्सवास सुरवात होत असून सदर गणपती विसर्जनाकरीता खारघरमध्ये एकही कृत्रीम तलाव गेल्यावर्षी देखील निर्माण कऱण्यात आला नव्हता. सद्य स्थितीला कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे व शासनाने आखून दिलेल्या नियमावलीप्रमाणे खारघर वासियांना गणेश विसर्जनासाठी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. तरी पनवेल महानगरपालिकेने तातडीने पुढाकार घेऊन खारघर वसाहतीसाठी वेगवेगळ्या ठिकाणीगणपती विसर्जनाकरीता कृत्रिम तलाव निर्माण करण्याची मागणी केली आहे.
           

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.