Press "Enter" to skip to content

एका भारतीय 52 वर्षीय महीलेने रचला इतिहास

समुद्रात 150 किलोमीटर पोहून विशाखापट्टणम ते काकीनाडा हा आव्हानात्मक प्रवास पूर्ण करून गोली श्यामला ठरली पहिली आशियाई महिला


मुंबई प्रतिनीधी : सतीश वि.पाटील

आंध्र प्रदेशातील 52 वर्षीय जलतरणपटू गोली श्यामला
हिने समुद्रात 150 किलोमीटर पोहून इतिहास रचला. विशाखापट्टणम ते काकीनाडा हा आव्हानात्मक प्रवास पूर्ण करणारी श्यामला ही पहिली आशियाई महिला ठरली आहे. 28 डिसेंबर रोजी त्यांनी विशाखापट्टणममधील आरके बीच येथून प्रवास सुरू केला आणि 5 दिवसात सूर्यरावपेट एनटीआर बीच (काकीनाडा) येथे पोहोचून आपले यश नोंदवले.

श्यामला दररोज 30 किलोमीटर पोहायची आणि तिच्या या प्रवासातून तिने महिलांसाठी एक प्रेरणास्थान बनून एक आदर्श निर्माण केला. राम सेतू, श्रीलंका आणि लक्षद्वीपमध्ये पोहणारी श्यामला तिच्या अदम्य इच्छाशक्ती आणि धैर्यासाठी ओळखली जाते. हैदराबादची हि जलतरणपटू जिद्द आणि लवचिकतेचे उदाहरण बनली आहे. पण लोक फक्त रील्स वर नाचऱ्या मुलींनाच लाईक करतात. अशा कौशल्याकडे सर्वजण दुर्लक्ष करतात. अभिमानास्पद गोष्ट एक भारतीय महीला पुरस्कार घेऊन ,गावाचे,आईवडीलाचे नाव लौकिक केले इतरांनी आदर्श घेण्यासारखा आहे अभिनंदन.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.