तृप्ती भोईर : उरण
अस म्हणतात मैत्री ला वय नसत तीला वार्धक्यही कधीच येत नाही. अगदी तसच पेण येथील आर्ट्स आणि कॉमर्स कॉलेजमध्ये पेणच्या बी ए १९८९-९० बॅचचे मैत्री चे ७ वे स्नेहसंमेलन रविवार दिनांक ५ जानेवारी २०२४ रोजी उंबर्डे येथे मोठ्या दिमाखात, उत्साही वातावरणात संपन्न झाले.
१९९० नंतर २८ वर्षाने सोशल मिडीयावर व्हॉट्स ॲप ग्रुप तयार करून एकमेकांशी संपर्क साधून २०१८ ला या मैत्रांगणाचे पहिले स्नेहसंमेलन कॉलेज चे माजी प्रिन्सिपल व माजी प्राध्यापक यांच्या उपस्थितीत पार पडले .त्यानंतर दरवर्षी हा मैत्री चा मेळावा जमून कॉलेज च्या मंतरलेल्या दिवसांच्या आठवणीत, थट्टा मस्करी करत, सुखदुःखाच्या गुजगोष्टी करून जीवनातील एक दिवस सुवर्ण क्षण साजरा करीत असतात. त्याचप्रमाणे दरवर्षी मित्र मैत्रिणीच्या पहिल्या पाल्यांच्या होणाऱ्या विवाहसोहळ्यासाठी ग्रुप कडून आर्थिक मदत दिली जाते. तसेच एखाद्या मित्र मैत्रिणीची आरोग्य विषयक मोठी अडचण असेल तर ग्रुप कडून आर्थिक मदत केली जाते. वर्षभर एकमेकांच्या सुख दुखात सर्व मित्र मैत्रिणी आवर्जून सहभागी होत असतात. आणि मैत्री धर्म निभावत असतात. दरवर्षी याच ग्रुपमधील पाच ते सहा मित्र मैत्रीणी या संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी घेतात व संपूर्ण कार्यक्रम पार पाडतात.
यावर्षी आशिष म्हात्रे, अनंत गायकर, मोहन कोठेकर,वंदन भगत, सुचिता ठाकूर, लता म्हात्रे,व शशिकला कोळी यांनी हि जबाबदारी सुंदररीत्या पार पाडली. दिनांक ५ जानेवारी रोजी हे सातवे स्नेहसंमेलन ग्रुपमधील आशिष म्हात्रे याच्या घरी व निसर्गाच्या सानिध्यात आमराईत साजरे झाले.
कार्यक्रमाची सुरूवात गणेश पूजनाने झाली. उंबर्डे गावचे शिल्पकार मा. किशोर पाटील व पेणच्या उपनगराध्यक्ष मा. वैशाली कडू या मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले. त्यानंतर स्वागतगीतानंतर बी ए ८९-९० ग्रुपचा मैत्री केक कापण्यात आला. नाष्टा, अंताक्षरी, मित्र परिवारातील संजय कडू यांच्या कविता वाचन,तसेच सेवानिवृत्त मित्र मैत्रिणींचे व वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मित्र मैत्रिणींना गौरवण्यात आले. स्वादिष्ट भोजनानंतर पुढील वर्षाचे अर्थिक नियोजन, आनंदाने धमाल नृत्य, हास्य फवारे, टाळ्या, मौज मस्ती करुन हा अविस्मरणीय दिवस साजरा केला.
या स्नेह संमेलनासाठी ३५ च्या वर मित्र मैत्रिणीं उपस्थित होत्या.आज प्रत्येक मित्र मैत्रिणींचे वय ५५ च्या पुढे आहेत पण तरीही तरुणाईला लाजवेल असा उत्साह घेऊन हा दिवस हे मित्र मैत्रीणी स्वतःसाठी जगतात. या दिवसात दिवसभर मिळवलेला आनंद हृदयात साठवून वर्षभरा साठी जतन करून ठेवत असतात. आणि निघताना भावनिक होऊन एकमेकांचा निरोप घेतात पुन्हा पुढील वर्षी भेटण्यासाठी.
स्नेहसंमेलन यथोचित पार पाडण्यासाठी बी. ए. ८९-९० मैत्री परिवाराचे सर्व सदस्य, आणि आशिष म्हात्रे यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य यांनी मोलाचे योगदान दिले आहे.




Be First to Comment