Press "Enter" to skip to content

पेणच्या प्रांताधिकारीपदी विठ्ठल इनामदार यांची नियुक्ती

सिटी बेल लाइव्ह / पेण ( प्रशांत पोतदार ) 

महाड येथील प्रांतअधिकारी विठ्ठल इनामदार यांची पेणच्या प्रांताधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर पेणच्या विद्यमान प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांची महाड येथे बदली झाली असून त्या महाडच्या प्रांत अधिकारी म्हणून लवकरच पदभार स्वीकारणार आहेत.

मूळचे सांगली येथील विठ्ठल इनामदार यांनी अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालय येथे यापूर्वी काम केलेली आहे. त्याच प्रमाणे सावंतवाडी व महाड येथे त्यांनी प्रांताधिकारी म्हणून आपले कर्तव्य चोख बजावले आहे. मागील १२ वर्षांपासून ते महसूल विभागात कार्यरत असून या काळात त्यांनी गोरगरीब जनतेची कामे केली आहेत.कोरोना संकटात एकही सुट्टी न घेता रात्री उशिरापर्यंत कार्यालयीन वेळे व्यतिरिक्तही प्रतिमा पूदलवाड यांनी कर्तव्यदक्ष राहून आपली कामगिरी चोख बजावली आहे. पेण येथे प्रांताधिकारी म्हणून कार्य करताना पुदलवाड यांनी हजारो गोरगरीब नागरिकांच्या समस्या सोडविल्या आहेत


Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.