सिटी बेल लाइव्ह / चिरनेर #
पत्रकार मिलिंद खारपाटील यांचे वडील गजानन गणू खारपाटील यांचे नुकतेच वृद्धापकाळाने 84 व्या वर्षी दुःखद निधन झाले.
शालेय परीक्षेत ते नेहमी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. डी एड ला ते रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते .
उकरुळ, चिंचवली, चिरनेर, कापडे बुद्रुक, धामणदेवी, कलंबूसरे, मोर्बे आदी शाळांवर त्यांनी शिक्षक सेवा केली.
गुरुजींचे 14 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक आहेत. अनेकजण डॉक्टर, वकील, शिक्षक, सैनिक, इन्स्पेक्टर असे मोठ्या हुद्द्यावर आहेत.
2 कोटींहून आधिक पोस्टची आर डी आणि नॅशनल सेव्हिंग केल्याबद्दल त्यांना जिल्हाधिकारी यांनी सन्मानित केले होते.1982 साली रायगड जिल्हा परिषदेने त्यांना रायगड जिल्हा आदर्श शिक्षक आणि शिवभूमी शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले होते.
रामप्रहरगौरव, कोकणरत्न, जीवनगौरव आदी पुरस्काराने त्यांना सन्मानित केले होते.
त्यांचे दशक्रिया विधी आणि उत्तरकार्य 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वाजता चिरनेर खाडी येथे होणार आहेत. यावेळी खारपाटील कुटूंबाकडून गुरुजींच्या स्मृतिप्रीत्यर्थ वटवृक्ष आणि पिंपळ वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.






Be First to Comment