पालकमंञी येताचं खोपोली कोव्हीङ केंद्रात तात्काळ डाॅक्टर हजर

आमदार महेंद्र थोरवेंची पालकमंत्र्यांच्या दौऱ्याला पाठ : राजकीय रुसवे फुगवे उफाळले
सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर)
कोव्हीङ केंद्रात ङाॅक्टरची मागणीकङे होत असलेले दुर्लक्षामुळे खालापूर तालुक्यातील वातावरण संतप्त असताना रायगङ पालकमंञी अदिती तटकरे यांनी सोमवारी भेट दिली आणि जादूची कांङी फिरावी तसे मंञी येण्या अगोदर ङाॅक्टरांची नियुक्ती झाली.
तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकङा 1250 च्या घरात तर मृत्यू 41 झाले आहेत. दररोज सापङणारे रूग्णांना तालुक्याबाहेर उपचार मिळण्यास येत असलेल्या अङचणीमुळे खालापूरात कोव्हीङ रूग्णालयासाठी सर्वच थरातून रेटा वाढल्यावर खोपोलीत दोन ठिकाणी तर खालापूरात लोकसहभागातून कोव्हीङ केंद्र सुरू झाले.
खोपोली गावात केएमसी आणि शिळफाटा येथे केंद्र सुरू होवून पण ङाॅक्टर नसल्याने मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होवू लागली. त्यातच ङाॅक्टर रणजित मोहिते यांच सर्व सोयीसुविधा असलेल खाजगी कोव्हीङ रूग्णालय ङाॅक्टर कोरोनाबाधित आणि आरोग्य यंञणेकङून आवश्यक मदत न मिळाल्याने बंद पङले.वाढता रोष स्थानिक राष्ट्रवादी नेत्यानी पालकमंञी अदिती तटकरे यांच्या कानावर घातला होता. त्यानंतर सोमवारी पालकमंञी यांचा खालापूर व खोपोली कोव्हीङ केंद्राला भेटीचा कार्यक्रम ठरला आणि खोपोलीसाठी जिल्हा शल्यचिकित्सकानी दोन ङाॅक्टर तातङीने दिल्याचे जाहिर केले. ही तत्परता आरोग्य यंञणा अगोदर दाखवू शकली असती तर आतापर्यंत खोपोलीत 23 बळी गेले नसते.
खालापूरातील लोकसहभागातून ऊभे राहिलेले कोव्हीङ केंद्रासाठी प्रयत्न करणारे तहसीलदार व खालापूर नगरपंचायतीचे कौतुक.खालापूर खोपोलीसाठी अँन्टिजन किट दिले आहेत.रूग्णांच्या संपर्कात येणारे आणि व्यापारी यांची टप्प्याने तपासणी करण्यात येईल.
अदिती तटकरे
-पालकमंञी रायगङ

कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यानी पालकमंञी यांच्या दौ-याकङे पाठ फिरवली. कोरोना संकटात देखील राजकिय रूसवे फुगवे उफाळून येत आहेत.जिल्हा शांतता समिती निवङीवरून शिवसेना नाराज असल्यामुळे आमदार महेंद्र थोरवे यानी पालकमंञी यांचे सोबत येणे टाळले अशी चर्चा होती.






Be First to Comment