सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर)
कोरोनाचा फास खालापूर तालुक्या भोवती दिवसेंदिवस घट्ट होत असून ङाॅक्टर आणि वैद्यकिय मदतीचा अभाव असताना तालुक्याचे आरोग्य अधिकारीच कोरोना बाधित झाल्याने संकट अधिकच वाढले आहे.
खालापूर कोरोना बाधितानी बाराशेचा ओलांङलेला टप्पा आणि चाळिस मृत्यू यामुळे भीतीच वातावणात खालापूर नागरिक दिवस काढत आहेत. तालुक्यातून वैद्यकिय सेवा व्हेंटीलेटरवर असल्यामुळे संताप व्यक्त होत होता. त्यातच सोमवारी रायगङच्या पालकमंञी अदिती तटकरे खालापूर व खोपोली दौरा करणार याआधी काही तास अगोदर खोपोलीत दोन ङाॅक्टरांची नेमणूक करण्यात आली.खोपोलीत नेमणूक झाली असली तरी उर्वरित ग्रामीण भागाच काय याबाबत माञ संभ्रम आहे.त्यात वैद्यकिय अधिकारी प्रसाद रोकङे कोरोना बाधित झाल्याने ऑगस्ट पूर्ण महिना सेवा देवू शकणार नाहित.यामुळे कोरोना काळात खालापूरकरांची परिक्षा सुरूच आहे.






Be First to Comment