Press "Enter" to skip to content

विद्यार्थ्यांचा अनोखा संकल्प

बारावी बोर्डाची परीक्षा संपेपर्यंत मोबाईल न वापरण्याचा करियर कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांचा निर्धार

खोपोली : खोपोली शहरातच नव्हे तर युवा वर्गात मोबाईल वापरण्याचे फॅड दिवसेंदिवस वाढत चाललेले असल्याने अभ्यासावर परिणाम होतोच त्याचसोबत अनावश्यक आणि गैरप्रकार वाढू लागल्याने खोपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक या शितल राऊत यांनी काही दिवसांपूर्वी युवा वर्गाला मोबाईलचा गैरवापर टाळण्यासंबंधी आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत खोपोलीतील करियर कोचिंग क्लासेसच्या बारावीच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी यंदाची बोर्डाची परीक्षा संपेपर्यंत मोबाईल फोन न वापरण्याचा निर्धार केला. खोपोली पोलीस स्टेशनमध्ये आज छोटेखानी कार्यक्रमात निरिक्षक आणि अधिकारी यांच्या उपस्थितीत सर्व विद्यार्थ्यांनी आपापले मोबाईल करियर कोचिंग क्लासेसचे संचालक डॉ.मुफद्दल शाकीर यांचेकडे जमा केले. येणाऱ्या काही दिवसात याहूनही अधिक संख्येने विद्यार्थी या आववाहनास प्रतिसाद देतील असा विश्वासही व्यक्त केला गेला.

खोपोलीचे पो. नि .शितल राऊत यांनी या निर्णयाचे स्वागत करत सर्व विद्यार्थी वर्गाला शुभेच्छा दिल्या असून अशा निर्धाराने त्यांचे अभ्यासाकडे जास्त लक्ष केंद्रित होऊन त्याचा परिणाम चांगल्या उत्तम रिझल्टवर होईल असा आशावाद व्यक्त केला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत व्हरांबळे आणि पोलीस कर्मचारी प्रसाद पाटील यांचे समवेत हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर हे देखील उपस्थित होते.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.