Press "Enter" to skip to content

अँटी कोविड ड्रग रेजिमेंट मध्ये आणखीन एक खेळाडू दाखल

सन फार्मा चे फ्ल्यू गार्ड सगळ्यात स्वस्त

अँटी कोविड ड्रग रेजिमेंट मध्ये आणखीन एक खेळाडू दाखल

सिटी बेल लाईव्ह/ Exclusive

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असतानाच त्यांना दिलासा देणारी एक बातमी आहे. कोरोनावर उपचारात सध्या केंद्रीय औषधे महानियंत्रकांनी अनुमती दिलेल्या एकमेव फॅव्हीपिरावीर या औषधाचा आणखी एक ब्रँड भारतीय बाजारपेठेत दाखल होतो आहे. भारतातील  सन फार्मास्युटीकल या कंपनीने ‘फ्ल्यूगार्ड’ या नावाने हे औषध बाजारात आणले आहे. त्याची आतापर्यंतची सर्वात कमी म्हणजे प्रतिगोळी 35 रुपये इतकी किंमत निश्‍चित केली आहे. महिन्यापूर्वी बाजारात दाखल झालेल्या दुसर्‍या कंपनीच्या याच औषधाच्या ब्रँडच्या तुलनेत ही किंमत तब्बल 70 टक्क्यांने कमी असल्याने रुग्णांच्या उपचारावरील खर्चात कपात होण्यास मदत होणार आहे.

भारतात गेले काही दिवस 50 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण नव्याने निर्माण होत आहेत. या रुग्णांवर तातडीने व किफायतशीर दरामध्ये उपचार उपलब्ध होणे ही काळाची गरज आहे. ही गरज ओळखून सन फार्माने बाजारात हे औषध उपलब्ध केले असून, सर्वसामान्य रुग्णांना त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ होईल, असे सन फार्माने म्हटले आहे.

कोरोनाची सौम्य व मध्यम स्वरुपाची लक्षणे असलेल्या रुग्णांना फॅव्हीपिरावीर हे औषध गुणकारी ठरते असा दावा महिन्याभरापूर्वी भारतातील ग्लेनमार्क फार्मा या औषध कंपनीने केला होता. या औषधाच्या तीन टप्प्यांतील चाचण्या पूर्ण झाल्या आहेत आणि त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत असल्याचेही सिद्ध झाले आहे. ग्लेनमार्कने सर्वप्रथम हे औषध 105 रुपये प्रतिगोळी या दराने बाजारात आणले. 15 दिवसांत कंपनीने हा दर कमी करून प्रतिगोळी 75 रुपये केला. यानंतर पुण्याच्या ब्रिलियंट फार्माने 59 रुपयांत फॅवीटन हे औषध बाजारात आणल्यानंतर जेनर्बक्ट फार्मा या कंपनीने हेच औषध फॅवीव्हेंट या नावाने प्रतिगोळी 39 रुपये या दराने बाजारात उपलब्ध केले. आता सन फार्माने प्रतिगोळी 35 रुपये दराचे ‘फ्ल्यूगार्ड’ हे औषध बाजारात आणून ही स्पर्धा अधिक तीव्र केली आहे.

सन फार्मा सारख्या कंपनीच्या अँटी कोविड ड्रग रेजिमेंट मध्ये येण्याने स्पर्धा तीव्र झाली आहे. एवढेच नाही तर दिग्गज कंपन्यांच्या येण्याने औषधे देखील सर्वत्र उपलब्ध होण्यास मदत होईल. ग्लेनमार्क कंपनी चे रिसर्च प्रॉडक्ट असल्याकारणामुळे त्यांनी किंमत जास्त ठेवणे अभिप्रेत होते, परंतु आता त्यांना देखील आपल्या औषधांची किंमत कमी करावी लागेल.

More from मुंबईMore posts in मुंबई »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.