आज सापडले ५२ रूग्ण : एकाचा मृत्यू
कोरोना बाधित रुग्णांची संख्या पोहोचली ८२३ वर : शहराचा धोका अधिक वाढला
सिटी बेल लाइव्ह / कोलाड (कल्पेश पवार)
रोहे तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस अधिक वाढू लागला असून,आज कोरोना रूग्णांनी उच्चांकी पातळी गाठली आहे. आज नव्याने ५२ रुग्ण पाँझिटिव्ह सापडल्याने सर्वत्र भितिदायक परिस्थिती निर्माण झाली. आजच्या आकडेवारीनुसार
तालुक्याची एकूण रूग्ण संख्या ही ८२३ वर पोहोचली आहे तर आज एका मृत्यूची नोंद झाली आहे.
रोहे तालुक्यात कोरोनाच्या संसर्गाने अक्षरक्ष: थैमान घातले आहे.त्यात रोज नवीन रूग्ण सापडू लागल्याने तालुक्यासह शहराचेही टेन्शन वाढू लागले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे सर्वांनाच मोठी चिंता वाटू लागली आहे.
सध्या २६७ रूग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत तालुक्यात १८ जण मयत झाले आहेत.तर ५३८ रूग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज दिला आहे. तरी घरीच राहा सुरक्षित रहा व आपल्याबरोबर आपल्या परिवाराचेही संरक्षण करा असे आहवान प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.






Be First to Comment