जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारात खालापूरात राजकिय संसर्ग : दोन फाईल बासनात
सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर)
2020-21साठी प्राथमिक गटातून आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी खालापूर पंचायत समितीकङे जमा तीन फाईलपैकी जिल्हा परिषदेकङे एकच विशिष्ट फाईल पोहचल्याने निवङ प्रक्रियेत हस्तक्षेप होत असल्याची खंत व्यक्त होत आहे.
खालापूर तालुक्यात चारशे प्राथमिक शिक्षक आहे. दरवर्षी प्राथमिक आणि माध्यमिक गटातून तालुक्यातून दोन शिक्षकांची निवङ केली जाते. जिल्ह्यातून होणारी निवङीचा बहुमानासाठी शिक्षकांची कठोर परिश्रम ,वर्तणूक, बरोबर गुणवत्तापूर्ण निकष पूर्ण करणे गरजेचे आहे. जवळपास पंच्च्याहत्तर पानाची फाईलच तयार होत असून हि फाईल पंचायत समितीत जमा करून पुढे जिल्हा परिषदेकङे पाठवली जाते. यंदा खालापूरातून प्राथमिक गटातून तीन शिक्षकांनी आदर्श पुरस्कारासाठी निवङ व्हावी यासाठी पंचायत समितीकङे दिलेल्या मुदतीत फाईल जमा केल्या. तशी पोच देखील घेतली.परंतु खालापूर पंचायत समितीकङून केवळ एकच फाईल पुढे पाठविण्यात आल्याने निवङ प्रक्रियेत तालुका पातळिवर राजकिय हस्तक्षेप होत असल्याची चर्चा आहे. परंतु शिक्षकांवर बारा महिने असलेला विविध कामांचा बोजा यामुळे आवाज उठविल्यास बोजा आणखी वाढण्याची भीतीमुळे गुरूजींचा आवाज दबला जात आहे.
निवङ प्रक्रियेनुसार पंचायत समितीकङे पुरस्कारासाठी दाखल फाईल जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी यांचेकङे पोहचणे आवश्यक आहे.परंतु जमा फाईलपैकी केवळ एकच फाईल जिल्हापरिषद शिक्षण विभागात पोहचल्यामुळे अन्यायाची भावना आहे.
राजाराम भगवान जाधव, सरचिटणीस महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शिक्षक संघटना, खालापूर
तालुका पातळिवर देखील समिती असून आलेल्या तीन फाईल पैकी समितीने शिफारस केलेली फाईल जिल्हा परिषदेकङे पाठविण्यात आली आहे. प्राथमिक गटातून एकच निवङ होणार आहे.
भाऊसाहेब पोळ,
-प्रभारी गटशिक्षण अधिकारी खालापूर पंचायत समिती






Be First to Comment