
सिटी बेल लाइव्ह / पाणदिवे / प्रतिनिधी #
आज सायंकाळी एका दुर्मिळ माकड (VERVET MONKEY) मादी (FEMALE) ही कळंबुसरे येथे कंपनी जवळ असलेल्या लाईटच्या डीपीला करंट लागून जखमी झाली आहे असे कळवून प्राणी मित्रांना बोलावले.
आनंद मढवी , विवेक केणी , महेश भोईर , बंटी शेळके , विनीत मढवी या प्राणी मित्रांनी जाऊन त्या दुर्मिळ जरा माकडाला पकडून या सर्व घटनेची माहिती वनाधिकारी सशांक कदम यांना दिली. व त्या दुर्मिळ जरा माकडावर परिचारिक प्रमोद मोकल (विंधणे ) यांना बोलावून त्याच्यावर प्रथमोपचार केले. नंतर त्या दुर्मिळ जरा माकडाला इंद्रायणी जंगलात सुरक्षित पणे सोडून दिले .
या दुर्मिळ माकडाला जंगलात सोडते वेळेस वरील प्राणी मित्र व वन्यजिव निसर्ग स्वरक्षण संस्था उरण चे सदस्य उपस्थित होते .






Be First to Comment