मुंबई गोवा महामार्गाचे काम निट करा नाहीतर ठेकेदाराला कामाचे पैसे दिले जाणार नाही – पालकमंत्री आदिती तटकरे
सिटी बेल लाइव्ह / पेण (प्रशांत पोतदार)
मुंबई गोवा महामार्गाचे काम निट होत नसल्याची तक्रार होत आहे.जर महामार्गाचे काम सात दिवसात निट झालेले दिसले नाही तर ठेकेदाराला बिलाचे पैसे दिले जाणार नाही अशा स्पष्ट शब्दात राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी ठेकेदार तसेच अधिकाऱ्यांना फटकारले.
पालकमंत्री आदिती तटकरे या (आज) सोमवार रोजी रायगडच्या दौऱ्यावर होत्या यावेळी त्यांनी पेण तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली यावेळी त्याबोलत होत्या.काही दिवसार गणेशोत्सव आला असुन मुंबई गोवा महामार्गावरुन वाहणांची वर्दळ वाढणार आहे तसेच महामार्गाच्या झालेल्या दुरावस्थेमुळे मोटारसायकल तसेच इतर वाहन चालकाला त्रास सहन करावा लागत असल्याने महामार्गाच्या कामाबाबत तक्रारी वाढत असल्याने राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पेण तालुक्यातील महामार्गाची पाहणी केली.
यावेळी उपस्थित अधिकारी तसेच ठेकेदाराला मुंबई गोवा महामार्गाचे काम निट करण्याची तंबी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली.या दौऱ्या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सचिव रुपेश पाटिल यांनी महामार्गाच्या कामा बाबत तक्रार करुन निवेदन दिले तर यावेळी प्रांत प्रतिमा पुदलवाड, तहसीलदार अरुणा जाधव तसेच सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.






Be First to Comment