Press "Enter" to skip to content

विजवीतरण अधीक्षक अभियंत्यांना दीपक पाटील यांच्या नेतृत्वात निवेदन

शिहू झोतीरपाडा पुररेषेतील गावांना पोयनाड फीडरवरून वीजपुरवठा करावा : शिवसेनेची मागणी 

सिटी बेल लाइव्ह / पाली-बेणसे (धम्मशिल सावंत)

शिहू झोतीरपाडा विभागातील जनता सातत्याने खंडीत होणारा विध्दुतपुरवठा व सततच्या विजेच्या लपंडावाने अक्षरशः हैरान झाली आहे. या विभागाला कोलेटी वडखळ फिडरवरुन विद्युत पुरवठा जोडण्यात आला आहे. मात्र शिहू झोतीरपाडा विभाग हा भौगोलीकदृष्ट्या आंबा नदीपलीकडे असल्याने पावसाळ्यात सातत्याने येणारा पुर व अन्य नैसर्गीक आपत्तीचा फटका बसून विध्दुतपुरवठा सातत्याने खंडीत होत  आहे.

महापुरात विदधुत खांब व तारा तुटून पडतात, अशावेळी पुन्हा विजेचे पोल व तारा पूर्ववत करण्यास अनेक दिवस जातात, यामध्ये वेळ, श्रम व पैसे खर्च होतात.शिवाय विभागातील जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागतो. विजसमस्या कायमची मार्गी लावायची असेल तर शिहू झोतीरपाडा पुररेषेतील गावांना पोयनाड फीडरवरून वीजपुरवठा करावा अशी महत्वपुर्ण मागणी शिवसेना शाखा प्रमुख दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली  केली आहे.

यासंदर्भात वीज वितरणचे अधीक्षक अभियंता यांना निवेदन देण्यात आले आहे.  शिहू बेणसे झोतिरपाडा विभाग विजेच्या बाबतीत जणू शापित आहे. निसर्ग चक्रीवादळात हा विभाग पंधरा दिवस अंधारात बुडाला होता, तर अतिवृष्टीचा देखील या विभागाला फटका बसून वीजपुरवठा खंडित झाला होता. 

वर्षाचे बारा महिने विजसमस्येने त्रस्त झालेल्या येथील जनतेला दिलासा देणेकामी शिवसेनेने पुढाकार घेतला. महाराष्ट्र राज्य विजवितरण कंपनी मर्यादीत अधिक्षक अभियंता पेण यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेनेचे चोळे शाखाप्रमुख दिपक पाटील यांनी सदर विभागाला  पोयनाड फिडरमधून विजजोडणी करण्यात यावी अशा आशयाचा पत्रव्यवहार केला. 

बेणसे, झोतीरपाडा व शिहू विभाग आंबा नदी पूर रेषेत असल्याने या विभागाला कोलेटी वडखळ फिडरवरुन विध्दुतपुरवठा होत असल्याने पावसाळ्यात अनेकदा विजजोडणीकामी विलंब होत असून नागरीकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने सदर विजजोडणी पोयनाड फिडरवरुन करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे. या मागणीचे लवकरात लवकर दखल घेऊन कार्यवाही व्हावी अशी विनंती या पत्राद्वारे केली आहे.

यावेळी शिवसेना शाखाप्रमुख दिपक पाटील, माजी सरपंच विद्यमान सदस्य गणपत खाडे, कामगार नेते लक्ष्मण खाडे,सामाजिक कार्यकर्ते योगेश ठाकूर ,युवासेना विभाग अधिकारी कृतेश खाडे आदी उपस्थीत होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.