सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू)
आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह १८ जण सापडले आहेत. फक्त २ जणांना घरी सोडण्यात आले तर ३ कोरोनाग्रस्त मयत झाले आहेत.
आज एकूण पॉझिटीव्ह १००, उपचार करून बरे झालेले ८२८, उपचार घेणारे १३२, मयत ४० असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली. आज पर्यंत उरणमध्ये १ हजार जणांना पॉझिटीव्हची लागण झाली आहे.
आज रांजणपाडा १, भेंडखळ १, भाजी मार्केट उरण १, म्हातवली १, अंबिलवाडी केगाव १, डोंगर आळी केगाव १, जेएनपीटी ६, द्वारका नगर म्हातवली १, मोठी जुई १, धुतुम १, द्रोणागिरी १, वेश्वि १, बोकडविरा १ असे एकूण १८ पॉझिटीव्ह आढळले आहेत. आज फक्त धुतुम १ व डोंगरी १ यांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तर केगाव आवेडा १, नागाव १, मोरा कोळीवाडा १ असे ३ कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे.
उरण ग्रामीण भागात कोरोना पॉझिटीव्हचा आकडा वाढू लागला आहे. त्याचबरोबर मयतांचा आकडाही ग्रामीण भागात वाढू लागल्याने ग्रामीण भागातील जनतेने योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक बनले आहे. शासकीय यंत्रणेनेही याची जनजागृती करण्यावर जोर देणे आवश्यक बनले आहे.






Be First to Comment