Press "Enter" to skip to content

कोरोनामुळे ढोलकी व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम )


कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षी गणपती उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात यावा असे आव्हान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.यामुळे गणपती उत्सहात तेजीत असणारा ढोलकी व्यवसाय संकटात सापडला आहे.त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

साधारण गणपती उत्सवाच्या दोन महिन्याच्या अगोदर जुलै ऑगस्ट महिन्यात वर्षातुन एकदा ढोलकी व्यवसाय तेजीत असतो. याला कारण गणपती उत्सवात गणपतीची आरती,जागरण म्हणुन भजन,व गणपाती उत्सवात फेमस असणारा बाल्या नाच. कोरोनामुळे हे सर्व बंद असुन याला मुख्य असणारी वादक मेन ढोलकी तसेच बँजो वादक मधील वादक साहित्य यावर बंदी आहे. कोरोनामुळे अगदी साध्या पद्धतीने गणपती उत्सव साजरा करण्यात यावा असे आवाहन केले असून यामुळे ढोलकी बनवण्यासाठी कोणीही फिरकत नाही. यामुळे ढोलकी व्यवसाय संकटात सापडला आहे.
वर्षानुवर्ष गणपती उत्सवा पूर्वी दोन ते तीन महिने व्यवसाय एवढा तेजीत होता की रात्रनंदिवस सुरु होता. या तीन महिन्यात होणारा धंदा एवढा तेजीत होता की या धंद्यामुळे आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह वर्षभर सुरळीत होता. परंतु आम्ही फक्त दुकानात दुकान उघडून बसतो परंतु एखाद्या ग्राहक आला तर येतो नाहीतर दुकानात तसेच बसून राहावे लागत आहे असे ढोलकी वादक अमोल साळुंखे यांनी व्यक्त केले आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्ष्यात घेता सर्वत्र तीन ते चार महिन्यापासून लॉक डाऊन करण्यात आला परंतु याचा फटका हंगामा पुरता मर्यादित असणाऱ्या व्यवसायिकांवर बसला असल्याचे दिसुन येत असुन यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.