आपटा कोरलवाडी आदिवासींच्या रस्त्याला प्रशासकिय मंजुरी

सिटी बेल लाइव्ह / रसायनी-राकेश खराडे #
वारंवार पत्रव्यवहार आणि मोर्चें काढूनही स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांनंतरही कोरलवाडी आदिवासींना रस्ता,पाणी आणि शिक्षण यांसारख्या मुलभूत सुविधा नाकारणा-या प्रशासकीय यंत्रणेचा निषेध नोंदवून रविवारी जागतिक आदिवासीदिनी कोरलवाडी आदिवासी बांधवांनी प्रांत कार्यालयासमोर उपोषण सुरू केल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली.आणि शासकीय पातळीवर हालचालींना वेग येवून आदिवासी वाडीच्या रस्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ग्रामसंवर्धंन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष समाजसेवक संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गुरुदास वाघे, संतोष पवार, हरिश्चंद्र वाघे, रमेश वाघे,राजेश वाघे,भानूदास पवार आदिंसह ग्रामसंवर्धंन सामाजिक संस्थेचे उदय गावंड,राजेश रसाल यांनी पनवेल प्रांत कार्यालयासमोर रविवारी बेमुदत उपोषण सुरू केले होते.या उपोषणाच्या हत्याराने बावीस दिवस निद्रीस्त असलेल्या महसूल विभागाची मात्र धावपळ उडाली. यावेळी निवासी नायब तहसिलदार संजय मांडे, मंडळ अधिकारी मनीष जोशी,तलाठी कविता बली आणि कर्नांला तलाठी बलभीम लाटे यांच्यासह उपोषण स्थली भेट देत, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७(नवीन ६६)ते कोरलवाडी आदिवासी वाडीच्या रस्त्याला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेणव्दारा २०२०-२१या आर्थिक वर्षात ७ लाख ५० हजारांच्या आराखड्यात प्रशासकीय मंजुरी देण्यात आली.त्याचप्रमाणे रस्त्याचे डांबरीकरण करण्यासंबंधी शासन स्तरावर तत्काल कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते.






Be First to Comment