Press "Enter" to skip to content

स्वतः च्या अनुभवातून दुस-यांचा जीव वाचविणार

रसायनीतील दिपक कांबळी पुरविणार ‘प्राण’ वायू

सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे #

कोरोना या आजाराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे आणि कोरोना हा विषाणू प्रामुख्याने फुप्फुसावर प्रहार करत असल्याने रुग्णांमध्ये आॅक्सिजनचे प्रमाण कमी होवू लागते.व श्वासोच्छास घेण्यास त्रास होतो. अशामध्ये रुग्णांस बाहेरून आॅक्सिजनचा पुरवठा वेळीच न झाल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता असते.
दिपक कांबळी यांनी स्वत:हा अनुभव घेतला.मात्र स्वत:चा अनुभव स्वत:पुरता मर्यादित न ठेवता त्यांनी आॅक्सिजन अभावी कुणाचा मृत्यू होवू नये म्हणून सर्वंसामान्यांना आॅक्सिजन सिलेंडर अगदी मोफत देण्याचे ठरवून आपल्याला आलेला अनुभव दुस-याला येवू नये.यासाठी हा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे.
रसायनी परिसरातील चांभार्ली दुर्गांमाता काॅलनीतील मनसेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष दिपक कांबळी यांना काही दिवसांपूर्वी कोरोना विषाणूचा संसर्गं झाला होता.यावेली त्यांची आॅक्सिजन पातली कमी झाल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला.त्यांची आॅक्सिजन पातळी मोहोपाडा येथील नामांकित डाॅक्टरने तपासताच त्यांना पुढील उपचारासाठी हाॅस्पिटलात दाखल होण्याचा सल्ला दिला.दिपक कांबळी यांचे राजकीय क्षेत्रातील वर्चंस्व व मित्रमंडळी यांच्यामुले त्यांना नवी मुंबईतील डि.वाय.पाटील रुग्णालयात बेड उपलब्ध झाला.पंधरा दिवस कोरोना विषाणूशी झुंज दिल्यावर ते सुखरुप घरी परतले.

दरम्यान आॅक्सिजन न मिळाल्याने माणसाची स्थिती काय होवू शकते याचा अनुभव त्यांनी घेतला.व आपल्यावर जो प्रसंग आला तो इतर कुणावरही येवू नये, आॅक्सिजन वाचून कोणाचा प्राण जावू नये यासाठी दिपक कांबळी यांनी रसायनी, खालापूर तालुका व कर्जंत तालुका परीसरातील रुग्णांसाठी आॅक्सिजन सिलेंडरची मोफत सेवा सुरू केली आहे.

ज्या रुग्णांची आॅक्सिजन पातळी खालावली आहे.त्यांना मोफत आॅक्सिजन सिलेंडर पुरविणार असल्याचे दिपक कांबळी यांनी सांगितले.

दिपक कांबळी यांच्या स्तुत्य उपक्रमामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे.विशेष म्हणजे हि सेवा चौवीस तास सुरू राहणार आहे.यासाठी डाॅक्टरांचे शिफारस पत्र व स्वत:चे ओळखपत्र या कागदपत्रांची आवश्यकता भासणार आहे. अधिक माहितीसाठी ९९२२११३३७६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन दिपक कांबळी यांनी केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.