Press "Enter" to skip to content

किल्ला कोविड सेंटरसाठी रेफ्रिजरेटर व गरजेच्या वस्तूंची भेट


सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे (नंदकुमार मरवडे)

रायगडचे खासदार सुनिल तटकरे,पालकमंत्री आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रयत्नातून व रोहा इंडस्ट्रीयल असोसिएशन यांच्या सहकार्याने रोह्यातील किल्ला येथे उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरसाठी वरसे-धाटाव जि.प.गटातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सेंटरसाठी आवश्यक असणारी गरजेची भेट वस्तू व रेफ्रिजरेटरची भेट देण्यात आले.

सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून वरसे-धाटाव जि.प.गटातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी एकत्र किल्ला कोविड सेंटरसाठी सदर वस्तूंची भेट दिली आहे.यावेळी संपन्न झालेल्या छोटेखानी कार्यक्रम प्रसंगी जेष्ठ नेते रामाचंद्र म्हात्रे,वाशी सरपंच सतिश भगत,वरसे उपसरपंच अमित मोहिते,किल्ला उपसरपंच दिपक जमदाडे,जयवंत मुंढे,जगदिश भगत,महेश बामुगडे, डॉ.दुबे,सेंटरचे व्यवस्थापक श्री.ढेबे,मंगेश देवकर,राकेश करंजे,राकेश बामुगडे,नरेश चांदोरकर,नरेश बामुगडे,शंतनू रटाटे व रूपेश बामुगडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.