सिटी बेल लाइव्ह / उरण (प्रतिनिधी)
उरणांतील नागाव वारीक आळी येथे वास्तव्यास असणारे वैभव यशवंत कडू हे बांधकाम व्यवसाईक असून काल दुपारी आपल्या कामाच्या ठिकाणी दगडाच्या गाड्या घेऊन जात असताना याच गावांतील सम व्यवसाईक भूपेंद्र घरत यांनी सदरचे दगडाचे ट्रक अडवून आणि याच रस्त्याने मोटर सायकलवरून जात असणारे वैभव कडू आणि त्याचा मित्र निखील दीपक माळी यांना आडवून स्वतः जवळील पिस्तुल(गन) रोखून आज पासून या ठिकाणी तू काम करावयाचे नाही अशी धमकी दिली. शिवाय काहीं आंतारावर भूपेंद्र घरत यांच्या मर्जींतील काही व्यक्तींनी वैभव कडू यांना अडवून दमदाटी शिवीगाळी करीत फायटर व धारदार चॉपर हातात घेऊन त्यांच्या अंगावर धाऊन जात जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याची तक्रार वैभव कडू यांनी उरण पोलीस ठाण्यात केली आहे, यागंभीर प्रकरणाची त्वरित दखल घेत उरण पोलिसांनी या प्रकरणी त्वरित कारवाई करून 11 आरोपी पैकी 5 आरोपींना अटक केली आहे.तर या प्रकरणातील 6 आरोपींचा शोध उरण पोलीस घेत आहेत.
या प्रकरणी पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी आहे कि वैभव यशवंत कडू हे नागाव वारीक आळींतील रहिवाशी असून तें खडी-रेती-दगड-विटा-रेती-माती या बांधकामासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याचे सप्लायर्स म्हणून व्यवसाय करतात त्यांच्या हद्दीमधील असणाऱ्या पिरवाडी समुद्र किनार पट्टीची सातत्याने किनाऱ्यावर धडकणाऱ्या लाटांमुळे किनाऱ्याची मोठ्या प्रमाणात धूप झाली असल्याने ही होणारी धूप थांबविण्यासाठी संबंधीत खाते (सार्वजनिक बांधकाम खते उपविभाग उरण) यांच्या कडून किनार पट्टीची होणारी धूप थांबविण्या साठी दगडांचा बंधारा (पिचींग) घालण्याचे काम मे.सुभाष कंट्रक्शन यांना मिळाले आहे. कंट्रक्शन कंपनीने सदरच्या कामाचे वाटप स्थानिक प्रकल्पग्रस्त व्यक्तींना वाटप केले आहे. यामध्ये मनोहरशेठ भोईर, भूपेंद्र घरत,आणि वैभव कडू यांच्या व्ही.के.इन्फ्रा कंपनीचा समावेश आहे.
काही दिवस वादळीवारा-पाऊस यामुळे मे.व्ही.के. इन्फ्रा कंपनीने आपले काम बंद ठेवले होते ते काम दि. 8 ऑगस्ट 2020 रोजी व्ही.के. इन्फ्राचे मालक वैभव यशवंत कडू यांनी सुरु करण्यासाठी दगडाचे दोन डंफर आणून काम सुरु करण्यासाठी पिरवाडी समुद्र किनारी घेऊन जात असताना डंफर च्या सोबत आपल्या याहमा मोटर सायकल वरून वैभव कडू व त्याला कामात मदत करणारा त्याचा मित्र निखील दीपक माळी जात असताना या ठिकाणी याच गावांतील रहिवासी असणारे व याच ठिकाणी वाटून दिलेले काम करणारे भूपेंद्र घरत यांनी आपली मर्चिडीस कार क्र.एम एच 46 एएल 4774 ही कार डंफर ला आडवी घालून रस्ता अडविला व गाडी मधून उतरुन वैभव कडू यास पिस्तुल (गन) दाखवून काम बंद कर नाहीतर तुला संपवून टाकीन अशी धमकी देत भूपेंद्र घरात त्या ठीकाणावरून निघून गेला.असे फिर्यादी वैभव यशवंत कडू यांनी आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे.
फिर्यादीत पुढे म्हटले आहे.कि ही घटना सकाळी 07-00 वाजताची असून या नंतर सकाळी 10-00 वाजण्याच्या सुमारास वैभव कडू व त्याचा मित्र निखील माळी दोघे घरी जात असताना ओएनजीसी कंपनी समोर नागाव कडें जाणाऱ्या रस्त्यावर टाटा झेन या गाडी मधून व मोटार सायकल वरून भूपेंद्र घरत यांच्या सांगण्या वरून आलेल्या काही व्यक्तींनी हात मध्ये चौपर-फायटर सारखी हत्यारे घेऊन दमदाटी व शिवीगाळी करीत रस्ता अडून भूपेंद्र शेठने सागुंन देखील हा काम बंद करीत नाही याला संपवून टाका अशी धमकी दिली. यावेळी निखील माळी यांनी वैभवची बहीण भावना घाणेकरला फोन करून बोलविले असता बहीण आणि गणेश नलावडे या ठिकाणी आले तसेच पोलीसानाही कळविल्यामुळे पोलीसही हजर झाले.
पोलीस येताच सारे आरोपी येथून पळाले या नंतर वैभव कडू यांनी या घटनेची फिर्याद उरण पोलीस ठाण्यात दिली असता उरण पोलीस ठाण्यात गुन्हा र.न.316/2020 ,भा.द.वि.कलम 341-143-144-147-149-506(2),सह भाहका कलम 4-27, महाराष्ट्र प्लोईस अधिनियम कलम 37(1)(3),135 अन्वये गुन्हा दाखल केला असून,या अंतर्गत समीर कमलाकर पाटील,मायर प्रकाश भोईर,सागर रामदास म्हात्रे,मनिष दशरथ पाटील,योगेश अनंत भोसले,या दि.8 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी 19:06 वाजता अटक केली आहे तर या गुन्ह्यातील आरोपी भूपेंद्र मोतीराम घरत,प्रथमेश पाटील विनीत बोबले,अमित म्हात्रे,प्रशांत पाटील,कल्पेश भोसले या फरारी आरोपींचा शोध उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शना खाली सपोनि श्री.काठे.सपोनि वृषाली पवार, उपोनी श्री.चव्हाण पोलीस कर्मचारी घेत आहेत.






Be First to Comment