सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या प्राणांतिक उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कर्जत तालुक्यातील सकल मराठा समाजाचे वतीने कँडल मार्च काढण्यात आला.या कँडलमार्च मध्ये हजारो मराठा सहभागी झाले होते. महिला सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. हा कँडल मार्च कर्जतच्या इतिहासात नोंद होईल. असा ठरला.
कर्जत मध्ये सकल मराठा समाजाचे वतीने साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणाच्या निमित्ताने कर्जत येथे आज साखळी उपोषणाच्या चौथ्या दिवशी केंडल मार्च आयोजित करण्यात आला होता. साखळी उपोषणाच्या स्थळापासून सुरू झालेल्या कँडल मार्च ची सुरुवात झाली. लोकमान्य टिळक चौकातून सुरू झालेल्या केंडल मार्च मुख्य बाजारपेठ मधून स्टेशन रोड मार्गे डेक्कन जिमखाना येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मरकाजवळ येथे पोहचली. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांना ज्ञानेश्वर भालिवडे यांनी पुष्पहार घालून अभिवादन केल्यानंतर केंडल मार्च कचेरी रस्त्याने जावून पुढे नगरपरिषद अशी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवल आली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला मधुकर घारे यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी राजेश लाड, शंकर थोरवे, प्रकाश पालकर, अनिल भोसले, सुरेश फराट, काशिनाथ शिंदे, उदय पाटील आदी उपस्थित होते. येथून महावीर पेठ अशी पुन्हा मुख्य बाजारपेठ येथून उपोषण स्थळी पोहचली. विशेष म्हणजे हा कँडल मार्च कर्जतच्या इतिहासात आभूतपूर्व ठरला.
काल महाराष्ट्र बंदची हाक होती मात्र कर्जत मध्ये बंद पाळण्यात आला नाही कारण बंद मुळे व्यापाऱ्यांसह नागरिक व ग्रामस्थांनाही त्रास होतो. त्यामुळे आंदोलकांनी बंद न पाळण्याचा निर्णय घेतला व तो सकाळीच जाहिर केला. काल सायंकाळी आयोजित केलेल्या या कँडल मार्च मध्ये शेकडोच्या संख्येने महिला तर पुरुष आणि तरुण मंडळी हजारोच्या संख्येने सहभागी झाली होती. सुमारे दीड किलोमीटर अंतर लांब हा कँडल मार्च होता. कँडल मार्च रात्री संपल्यानंतर उपोषण स्थळी गेली चार दिवस साखळी उपोषणाला बसलेले उपोषणकर्त्यां पैकी राजेश लाड व उमेश म्हसे यांनी यांनी आपली भूमिका सांगितली तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या कडून अधिकृत भूमिका जाहीर होत नाही. तोपर्यंत कर्जत येथील साखळी उपोषण सुरूच राहील. असे यावेळी जाहीर करण्यात आले.
मनोज जरांगे – पाटील हे अंतरवाली सराटी येथे उपोषण करीत आहेत. काल महाराष्ट्र बंद असूनही कर्जतच्या आंदोलकांपैकी रमेश कदम व अरुण देशमुख यांनी उपोषण स्थळी भेट देऊन कर्जतकरांच्या पाठिंब्याचे पत्र दिले व पाठिंबा दर्शविला.
Be First to Comment