Press "Enter" to skip to content

मनोज जरांगे – पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा

कर्जतमध्ये सकल मराठा समाजाचे साखळी उपोषण

सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला असून आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेले मनोज जरांगे – पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी मराठा समाज आता रस्त्यावर उतरला आहे. कर्जत तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी टिळक चौकात साखळी उपोषणाला सुरुवात केली असून तीन दिवस हे उपोषण करण्यात येणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या उपोषणानंतर राज्य सरकारने आरक्षण देण्यासाठी चाळीस दिवसांची मुदत मागितली होती. ही मुदत संपल्याने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा योद्धा जरांगे – पाटील यांनी आंतरवाली सराटी (जि. जालना) येथे पुन्हा आंदोलन सुरु केलं.त्यामुळे संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्यावर मराठा समाज आक्रमक झाला. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जगभरातून पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने लोकमान्य टिळक चौकात साखळी उपोषणाचे आयोजन करण्यात आले होते. अनेक वर्षे मराठा आरक्षणासाठी लढा देत असलेले शंकर थोरवे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून घोषणा देत उपोषणाचा शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेश लाड, माजी सरपंच मधुकर घारे, नगरसेवक सोमनाथ ठोंबरे, हेमंत ठाणगे, माजी नगरसेवक गुरुनाथ पालकर, संतोष पाटील, अनिल भोसले, महेंद्र निगुडकर, ज्ञानेश्वर भालिवडे, संदीप भोईर, प्रकाश पालकर, काशिनाथ शिंदे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे, राजेश लाड, संभाजी जगताप, सरपंच प्रमिला बोराडे, पूजा सुर्वे, जगदीश ठाकरे, उमेश म्हसे, मधुकर घारे, स्वप्नील पालकर, सुरेश खानविलकर आदींनी मनोगते व्यक्त करताना, ‘मनोज जरांगे – पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आपल्या जीवाची बाजी लावली आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी हे उपोषण सुरू करण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. आमच्या मुलांना शिक्षण व नोकरीसाठी हे आरक्षण हवे आहे. अशी आमची मागणी आहे.’ असे स्पष्ट केले. याप्रसंगी खासदार विनायक राऊत, बबन पाटील, नितीन सावंत, एकनाथ पिंगळे आदींनी उपोषणकर्त्यांना भेट दिली.

माजी उपसभापती मनोहर थोरवे, भाई गायकर, अशोक सावंत, कृष्णा घाडगे,भगवान घरत, रमेश मते, भानुदास पालकर, प्रमोद खडे, प्रदीप सुर्वे, प्रमोद पिंगळे, रवींद्र घारे, सोमनाथ पालकर, शरद बडेकर, ज्ञानेश्वर कर्णुक, केतन मोधळे, केतन बोराडे, गजानन बोराडे, अजित पाटील, अशोक शिंदे, अजित पवार आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.