शिवसेनेकडून कोकण पदवीधर मतदार संघाची आढावा बैठक
सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆
कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून नुकताच आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी शिवसैनिकांनी केलेल्या कामाचे कौतुक करण्यात आले.
कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीची सध्या जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे. त्या अनुषंगाने राजकीय पक्ष कामाला लागले असून पदवीधर असलेल्या तरुणांचे त्या – त्या विभागानुसार अर्ज भरून घेतले जात आहेत. तर मतदार नोंदणी केली जात आहे. राजकीय पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्या माध्यमातून आढावा बैठकीचे आयोजन करून मतदारसंघातील परिस्थितीचा आढावा घेत आहेत. त्यानुसार रॉयल गार्डनच्या सभागृहात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने कोंकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. खासदार विनायक राऊत, युवा सेना सचिव वरूण सरदेसाई, कोकण पदवीधर निवडणूक प्रमुख किशोर जैन, जिल्हा संपर्क प्रमुख बबन पाटील, नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, एकनाथ पिंगळे, सुदाम पवाळी, रियाज बुबेरे, अनिता पाटील, सुधाकर देसाई आदी उपस्थित हिते.
यावेळी पदवीधर मतदारसंघाचा आढावा घेत असताना युवा तालुका प्रथमेश मोरे व युवा सेना यांनी कर्जत मधून मोठ्या संख्येने मतदार नोंदणी केली तर खालापूर मधून निखिल पाटील व सहकारी यांनी नोंदणी केली. यासाठी शिवसेना शाखा प्रमुख व शिवसेना पदाधिकारी महिला आघाडी पदवीधर मतदाराची भेट घेत आहेत. आपला महाविकास आघाडीच्या उमेदवार निवडून येईल यात शंका नसून अजून जोराने कामाला लागा म्हणून सूचना केल्या. यावेळी वैभव मोहिते या युवा तरुणाच्या पुढाकाराने शेलू कॉलेज येथील शिक्षक व विद्यार्थ्यांचा पक्ष प्रवेश घडवून आणला.
याप्रसंगी माजी नगरसेवक संतोष पाटील, निलेश घरत, ऍड. संपत हडप, विनोद पांडे, सरपंच प्रमिला बोराडे,, भिवसेन बडेकर आदींसह युवा शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment