Press "Enter" to skip to content

कर्जत काँग्रेस कडून हुतात्म्यांना आदरांजली


सिटी बेल लाइव्ह / कर्जत (संजय गायकवाड )

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झालेल्या आंदोलनात हुतात्मा झालेल्यांना कर्जत मधील स्मृती स्तंभाला वंदन करून कर्जत तालुका काँग्रेसच्या वतीने आदरांजली वाहिली.

कर्जत शहरातील हुतात्मा स्तंभाला कर्जत तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मुकेश तुकाराम सुर्वे यांनी माजी नगराध्यक्ष व काँग्रेसचे माजी जिल्हा सरचिटणीस धंनजय चाचड, तालुका उपाध्यक्ष संदीप पाटील, अल्पसंख्याक सेल जिल्हा सचिव इस्माईल दिवाण, शहर उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कडू, यांच्या समवेत पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

यावेळी नगरपरिषद कर्मचारी प्रदीप मोरे, अशोक रणदिवे आदी उपस्थित होते.

यावेळी नुकतेच दिवंगत झालेले कर्जत मधील काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते गणपत लोभी यांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी बोलताना मुकेश सुर्वे यांनी, ‘हुतात्म्यांमुळेच आपण सुखी जीवन जगत आहोत. पूर्वीच्या लोकांनी ज्या खस्ता खाल्ल्या, कष्ट केले हे हल्लीच्या पिढीला माहीत नाही. त्यांना सर्व सुविधा उपलब्ध असल्याने त्यांना त्याची जाणीव नाही. देशासाठी ज्यांनी हौतात्म्य पत्करले त्यांच्या आठवणी व त्यांचे कर्तृत्व नवीन पिढीला सांगणे गरजेचे आहे.’ असे सांगितले.

यावेळी चाचड यांनी ‘या स्मृती स्तंभाच्या परिसराचे पावित्र्य राखण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे.’ असे स्पष्ट केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.