जागतिक आदिवासी दिनानिमित्त रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिल्या शुभेच्छा…!
सिटी बेल लाइव्ह / रायगड: (धम्मशिल सावंत)
9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. आदिवासी संस्कृती संवर्धित व्हावी या हेतूने जागतिक संघटनेच्या वतीने हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो.या दिनाचे औचित्य साधून रानभाज्या प्रदर्शन ठेवण्यात आले होते.
रानभाज्यांमध्ये पोषक जीवनसत्व असतात, कोरोनासारख्या महामारीत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास त्या उपयुक्त ठरतील, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या. आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकास व उत्कर्षासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याची ग्वाही देत
रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आदिवासी बांधवांना शुभेच्छा दिल्या.






Be First to Comment