शांतीक्षेत्र प्रेमगिरी आश्रमामध्ये पारंपारिक सांस्कृतिक पद्धतीने पूजा, हवन आणि सामाजिक एकात्मिकतेसह साजरा
सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆
नवरात्री चा जागर खरया अर्थाने प्रत्येकास स्वतः मधील शक्ती नव्याने ओळखण्यासाठी चे पर्व आहे. मैत्रेय दादाश्रीजी यांच्या मार्गदर्शनात मैत्रीबोध परीवार कामतपाडा, जामरुंग येथील शांतीक्षेत्र प्रेमगिरी आश्रमामध्ये पारंपारिक सांस्कृतिक पद्धतीने पूजा, हवन आणि सामाजिक एकात्मिकते सह साजरा होत आहे. या निमित्ताने 43 गाव व पाड्यातील महिला व विद्यार्थ्यांना भोंडला, लोप पावत चाललेली प्राचीन पारंपरिक ग्रामीण नृत्य कला, वक्तृत्व, पोवडा, गायन व भजन सादरीकरण करत एकत्रित येण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
दररोज विविध 5 गावातील 350 महिला, दोन शाळेतील 100 विद्यार्थी आणि 4 प्रासादिक भजन मंडळी सकाळी 11 ते रात्री 12:30 पर्यंत हा आनंद लुटत आहेत. सहभागी प्रत्येक गावासाठी सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन कौतुक करण्यात येत आहे. प्रत्येक महिला ही त्यांच्या घरातील सदैव प्रज्वलित ज्योत असल्याचं स्मरण करून देण्यासाठी त्यांना हळद कुंकूवासह दीप देऊन कौतुक करण्यात येत आहे. सर्व सहभागी मुलांना वही, कलर, पेन्सिल व पेन देण्यात येत आहे. यंदा आश्रमातील नवरात्री उत्सवात आत्ता पर्यंत 1500 हून अधिक जणांनी सहभागी होत आपली सर्व चिंता विसरून एक परिवार स्वरूपात एकत्रित आले आहेत. होम हवन सुद्धा सुरू आहे.
विजया दशमीच्या दिवशी सकाळी 7:30 ते 1 पर्यंत कामतपाडा ते कर्जत सर्व 43 गावातील ग्रामस्थांसह पारंपरिक ढोल ताशा सह भव्य शोभा यात्रा, महा आरती, प्रसाद वितरण व माहेरची साडी कार्यक्रमदेखील आयोजित केला आहे. कृपया या उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Be First to Comment