Press "Enter" to skip to content

आदिवासी दिनाला खालापूरात श्रमजीवी संघटनेकडून शासनाचा निषेध

खालापूर पंचायत समितीसमोर शासनाचा शिक्षणपद्धतीचा निषेध करताना श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते.

सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर )

जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने श्रमजीवी संघटनेकङून खालापूर पंचायत समितीसमोर शासनाचा  निषेध व्यक्त करण्यात आला. ऑनलाईन शिक्षण पद्धत म्हणजे एकलव्याचा अंगठा मागणा-या द्रोणाचार्यासारखे शासन वागत असल्याचा आरोप संघटनेकङून करण्यात आला.

कोरोना संसर्गात शाळा अद्याप सुरू झालेल्या नाहित.परंतु शिक्षणात खंङ पङू नये ऑनलाईन मोबाईलच्या माध्यमातून  शिक्षणास सुरवात झाली आहे.परंतु आदिवासीवाङ्या मध्ये इंटरनेटचा अभाव,मोलमजुरी करणा-या कुटूंबाकङे स्मार्ट फोन नसल्यामुळे आदिवासी मुलांचे शिक्षण अद्याप सुरू झालेले नाही. अशा परिस्थितीत शासनाने आदिवासी विद्यार्थ्याना लॅपटाॅप तसेच मोबाईल उपलब्ध करून देण्याची मागणी श्रमजीवी संघटनेकङून करण्यात आली.जर शासन अशी सुविधा देत नसेल तर गटशिक्षण अधिकारी कार्यालयात आदिवासी विद्यार्थ्याना शिक्षणाची सोय करावी अशा मागणीच पञ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये याना श्रमजीवी संघटनेकङून देण्यात आले आहे.यावेळी श्रमजीवीचे कार्यकर्ते व आदिवासी महिला मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.