Press "Enter" to skip to content

थेलेसीमिया रुग्णांसाठीच्या विशेष रक्तदान शिबिरात 93 रक्तदात्यांनी केलं रक्तदान

जिव्हाळा फाऊंडेशन महाराष्ट्र आणि गोवठणे विकास मंचच्या उपक्रमास सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद

सिटी बेल लाईव्ह /अजय शिवकर /उरण #

जिव्हाळा फाऊंडेशन महाराष्ट्र, गोवठणे विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच समर्पण ब्लड बँक मुंबई यांच्या सहयोगाने आज दिनांक 9 ऑगस्ट रोजी विशेष रक्तदान शिबीर संपन्न झाले. कोरोना 19 च्या संकटात थेलेसीमिया रुग्णांची परवड होऊ नये यासाठी गोवठणे ता. उरण येथे भरवले होते. या शिबिरात तब्बल 93 रक्तदात्यांनी रक्तदान केले. ग्रामिण भागात हा एकप्रकारे उच्चांक म्हणावा लागेल.

थेलेसीमिया रुग्णांना दर 7 , 14, 21 दिवसांनी रक्त द्यावे लागते. उरण तालुक्यात असे अनेक रुग्ण आहेत, ज्यांना रक्ताची गरज भासते. कोविड संकटात पूर्वीइतकी रक्तदान शिबिर होत नसल्याने पुरेसे रक्त उपलब्ध होत नाही. त्यामुळे थेलेसेमिया रुग्णांच्या पालकांनी विशेष रक्तदान भरवले जावे अशी इच्छा आयोजकांकडे व्यक्त केली होती. त्याला प्रतिसाद देत जिव्हाळा फाऊंडेशन महाराष्ट्र्र आणि गोवठणे विकास मंच यांनी शिबिराचे आयोजन केले.

तत्पूर्वी शिबिराचे उद्घाटन पालवी सामाजिक संस्थेचे परशुराम भोईर, पीआरपी शिक्षण संस्थेचे प्रकाश पाटील, जिव्हाळा फाऊंडेशनचे अध्यक्ष रुपेश पाटील, गोवठणे विकास मंचचे सुनील वर्तक, दहागाव माजी विदयार्थी संघाचे विलास गावंड, पत्रकार अजित पाटील, गोवठणे सरपंच प्रणिती म्हात्रे, अनिल ठाकूर, मिलिंद पाटील, चेतन गावंड यांचे हस्ते झाले.

उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, परशुराम भोईर, प्रकाश पाटील, कौशिक ठाकूर, धिरेंद्र ठाकूर, अजय शिवकर आदींनी रक्तदाते तसेच आयोजकांचे कौतुक केले. तर भारतीय लष्करात असलेले संतोष (बंटी) ठाकूर, कुस्तीपटू अनघा ठाकूर, दिनेश्वर गाताडी, संतोष पोटे, नितेश पंडित, पपन पाटील, पप्पू सूर्यराव, अमृत म्हात्रे आदींनी उपस्थिती दर्शवली. समर्पण ब्लड बँक मुंबईच्या डॉ. पल्लवी जाधव यांच्या नेतृत्वातील पथकाने यावेळी समाधान व्यक्त केले.

ग्रामीण भागात रक्तदानाबद्दल असलेल्या जागरूकतेबाबत त्यांनी कौतुक केले.
जिव्हाळा फाऊंडेशनचे पंकज ठाकूर, वैभव पाटील, सुरेंद्र पाटील, हेमांगी पाटील, दर्शना माळी, सिद्धार्थ फाळके, देवेश म्हात्रे, हर्षद म्हात्रे, नितेश म्हात्रे, प्रताप म्हात्रे, शेखर म्हात्रे, भावेश म्हात्रे, चेतन ठाकूर, स्वराज घरत तर गोवठणे विकास मंचचे आनंद वर्तक, एड. जितेंद्र म्हात्रे, समीर म्हात्रे, संदीप पाटील, अमित म्हात्रे आदींनी शिबीर यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

प्रत्येक रक्तदात्यांना सन्मानपत्र सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच कला क्रीडा साहित्य क्षेत्रात कार्य केलेल्या समाजातील विशेष व्यक्तिमत्वांना सन्मानित करण्यात आले. द ग्रेट भूमिपुत्र फेसबुक पेजवरून मुख्य संपादक रोशन पाटील यांच्या सहकार्याने शिबिराचे प्रक्षेपण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पंकज ठाकूर यांनी केले तर सर्व रक्तदाते तसेच मान्यवरांचे आभार सुनील वर्तक यांनी मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.