Press "Enter" to skip to content

5 ऑगस्टच्या वादळात मजगावच्या समर्थ कला मंदिराचे मोठे नुकसान 

सिटी बेल लाइव्ह / रायगड : अमूलकुमार जैन #

पाच ऑगस्ट रोजी पुन्हा झालेल्या चक्रीवादळात मजगाव येथिल चंद्रकांत बुल्लु यांच्या मालकीच्या समर्थ कला मंदिराचे मोठे नुकसान झाले असून गणेशोत्सवाला दहाबारा दिवस असतांना मोठे आरिष्ट त्यांच्यावर आले आहे.
         चंद्रकांत बुल्लु यांचे मजगाव येथे समर्थ कला मंदिर आहे.त्यांच्या या कला मंदिरात शाडू व प्लॅस्टर ऑफ पॅरिस पासून साडेचारशे ते पाचशे लहानमोठ्या गणपतीच्या दरवर्षीच्या नोंदविलेल्या मूर्त्या तयार करण्यात आल्या होत्या.
आठवड्यापूर्वीपासून त्यांचे रंगकाम सुरु करण्यात आले होते.पाच ऑगस्ट रोजी दुपारी दीड ते दोनच्या दरम्यान झालेल्या चक्रीवादळाने कलामंदिरावरील पत्रे उडाले त्यात धो धो सुरु असलेल्या पावसाने सार्या मूर्त्या भिजल्या,शाडू माती व प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या गोणी भिजून वाया गेल्या आहेत.रंगसाहित्य,काॅम्प्रेसर,इनव्हर्टर 
मूर्त्या बनविण्याचे साचे,फायबरचे साहित्य,कास्टींग माॅडेल,प्लॅस्टरच्या तयार मूर्त्या,तुळशी वृंदावन,शोपीस आदी भिजून जवळपास सात ते आठ लाखाचे नुकसान झाले आहे.गणपतीच्या तयार मूर्त्या व रंगकाम केलेल्या मूर्त्या तुटल्या असून भिजलेल्या मूर्त्या वाळवायच्या कशा तसेच शाडूच्या मूर्त्या पुन्हा तयार कशा करावयाच्या असा प्रश्न  त्यांच्यापुढे पडला आहे.जवळपास पंधरा ते विस कामगारांनी महिन्याहून जास्त काळ केलेले काम चक्रीवादळाने एका क्षणात उधळून टाकल्याने बुल्लु मोठ्या आर्थिक संकटात सापडले असल्याने शासनाने त्वरीत अर्थसहाय्य करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.