शिशिरदादा धारकर, मिहीर धारकर ठाकरे गटात सामील
तर येणाऱ्या निवडणुकीत पेणचा आमदार शिवसेनेचा – माजी मंत्री अनंत गिते
सिटी बेल ∆ पेण ∆ प्रतिनिधी ∆
पेण नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष शिशिरदादा धारकर व युवा नेते मिहीर धारकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला असून त्यांच्यासमवेत यावेळी हजारों कार्यकर्त्यांनीही शिवबंधन बांधले आहे.त्यामुळे येणाऱ्या पेण नगरपालिका,पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये मोठी रंगत येणार आहे.
यावेळी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, आपण पेण मधील सर्व कार्यकर्ते हे पळपुट्या शिवसेनेमध्ये न जाता वाघाच्या शिवसेनेमध्ये आले आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात रायगडच्या राजकारणात मोठी कलात्मक मिळणार आहे. त्यामुळे येथे अधिक न बोलता पेणमध्येच येऊन विरोधकांचा समाचार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तर माजी नगराध्यक्ष शिशिर धारकर आणि युवा नेते मिहीर धारकर यांच्या पक्षप्रवेशामुळे पेण मतदार संघाची बाजू भक्कम झाली आहे.त्यामुळे या निवडणुकीत पेणचा आमदार हा शिवसेनेचाच असणार असल्याने आपण कार्यकर्यात्यांनी कामा लागा असे यावेळी माजी मंत्री तथा शिवसेना नेते अनंत गिते यांनी सांगितले.
यावेळी संपर्क प्रमुख विष्णूभाई पाटील, बबनदादा पाटील, जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, उपजिल्हा प्रमुख अविनाश म्हात्रे, महिला आघाडी जिल्हा संघटिका दिपश्री पोटफोडे, तालुका प्रमुख जगदीश ठाकूर, रशादभाई मुजावर, पेण शहर प्रमुख मयुरेश चाचड, संदिप सुर्वे, श्रीतेज कदम, युवा सेना अधिकारी राकेश मोकल आदिंसह माजी नगरसेवक, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Be First to Comment