Press "Enter" to skip to content

उरणमध्ये आज १४ पॉझिटीव्ह, ५ जणांना डिस्चार्ज तर दोघांचा मृत्यू


सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू)

आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह १४ जण सापडले आहेत. ५ जणांना घरी सोडण्यात आले तर २ कोरोनाग्रस्त मयत झाले आहेत. आज एकूण पॉझिटीव्ह ९८२, उपचार करून बरे झालेले ८२६, उपचार घेणारे ११९, मयत ३७ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.

आज दादारपाडा १, जासई शंकर मंदिर जवळ १, मोरा रोड १, जासई १, कोप्रोली १, करंजा नवापाडा १, डाऊर नगर १, मोरा कोळीवाडा १, बालई १, सोनारी १, द्रोणागिरी १, बोकडविरा १, न्हावा शेवा पोलीस स्टेशन १, गोकुलधाम उरण १ असे एकूण १४ जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. उरण २, जेएनपीटी १, आवरे १, करंजा १ असे ५ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तर गोकुलधाम उरण १ व द्रोणागिरी १ असे २ कोरोनाग्रस्ताचा मृत्यू आज झाला आहे.
उरण ग्रामीण भागात पॉझिटीव्हचा आकडा कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातील जनतेने जागृत राहावून योग्य ती खबरदारी घेत कोरोनाचा सामना करावा लागणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.