Press "Enter" to skip to content

लोकसहभागातून गंदगीमुक्त भारत मोहीम यशस्वी करावी

रायगड जिल्हा परिषदेचे सीईओ डाॅ. किरण पाटील यांचे आवाहन

सिटी बेल लाइव्ह / अलिबाग (धनंजय कवठेकर)

नागरीकांमध्ये स्वच्छता व आरोग्याकडे सकारात्मक दृष्टीने प्रभावी जनजागृती व्हावी या उद्देशाने केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने दि. 8 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत गंदगी मुक्त भारत मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होवन ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
याच विषयाच्या अनुषंगाने डॉ. किरण पाटील यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्स व्दारे गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत, आरोग्य शिक्षण,गटसमन्वयक व समुह समन्वयक ) यांचेशी संवाद साधला. ते म्हणाले प्रभावी संवाद हा अभियानाचा आत्मा आहे. स्वच्छता ही लोक चळवळ बनवावी, शौचालयाचा नियमीत वापर, घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टीक बंदी आदीव्दारे पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत होणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या परिस्थितीत प्रभावी स्वच्छता केल्यास कोरोना नियंत्रण येण्यास मदत होईल. लोक प्रतिनीधी यात उत्स्फूर्त सहभाग घ्यावा. स्वच्छते नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणारे स्वयंसेवी संस्था,व्यक्ती एनएसएस, नेहरू युवा केंद्र आदींचे या स्वच्छता उपक्रमासाठी योगदान महत्वाचे ठरणार आहे. हे अभियान गावस्तरावर सरपंच व ग्रामसेवक यांनी मोठया प्रमाणावर पुढाकार घेवन गावस्तरावर यशस्वी करावे असे ही ते म्हणाले.
या अभियानांतर्गत् दि. 9 ऑगस्ट रोजी ग्रामस्तरावर सिंगल युज प्लास्टीकचे संकलन व वर्गीकरण दि.10 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत व सार्वजनिक परीसरातील ईमारतीमध्ये श्रमदान मोहिम राबविणे, दि. 11 ऑगस्ट रोजी गावातील भिंतीवर स्वच्छता संदेश् रंगविणे, दि.12 ऑगस्ट रोजी वृक्षारोपणाचे उपक्रम राबविणे, दि. 13 ऑगस्ट रोजी गंदगीमुक्त माझे गाव या विषयावर ऑनलाईन चित्रकला स्पर्धा (इयता .06 ते 08 वी) तसेच याच विषयावर निबंध स्पर्धा (इयता 09 ते 12 वी), दि.14 ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोगय केंद्रामध्ये स्वच्छता व निर्जतुकीकरण करणे, दि.15 ऑगस्ट रोजी ओडीएफ प्लस कार्यक्रमाची घोषणा करणे हे उपक्रम राबविण्यात यावेत. तसेच टोल फ्री क्रमांक 18001800404 या वर स्वच्छाग्रही व नागरीकांनी प्रतिसाद नोंदवावा.
तसेच ग्रामपंचायत स्तरावर दि. 15 ऑगस्ट रोजी ग्रामस्थांना कोवीड 19 च्या पार्शभूमीवर सामाजिक अंतर ठेवून स्वच्छतेची शपथ व इतर उपक्रम राबविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.