सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू)
लॉकडाऊनच्या काळात रांजणपाडा, सुरूंगपाडा या गावातील नागरिकांना अन्नधान्य वाटप करावे म्हणून आयओटीएल आणि ऑल इंडिया या २ कंपनीच्या प्रशासनाला पत्रव्यवहार करून मागणी केली होती. त्याप्रमाणे त्यांनी दिलेल्या मदतीच्या हातभाराचे आज वाटप करण्यात आले.
ऑल इंडिया या कंपनीने ५०० किलो तांदूळ आणि आयओटीएल कंपनीने १ लाख रूपयाचे जीवनावश्यक वस्तूंचे २५० कुटुंबांना पॅकेज (तांदूळ ३ किलो साखर १ किलो तेल १ लीटर हळद मसाला मीठ आणि डाळ इत्यादी जीवनावश्यक वस्तू) दिले. त्यांचे आज क्रांती दिन रविवार दि. ९ ऑगस्ट रोजी वाटप करण्यात आले.
याकामी जासईचे सरपंच संतोष घरत, धुतूमचे ग्राम पंचायत सदस्य शरद ठाकुर, रांजणपाडा येथील मुरलीधर ठाकुर, ग्रामपंचायत सदस्या रूपाली पाटील सुरूंगपाडा येथील संतोष तांडेल यांचे सहकार्य लाभले. आयओटीएलचे मॅनेजर मोघे आणि ऑल इंडियाचे मालक जितू शहा या सर्वांचे मनापासून आभार मानण्यात आले.
सदर अन्नधान्याचे वाटप सरपंच संतोष घरत, शेकाप उरण तालुका पुरोगामी युवक संघटना अध्यक्ष रमाकांत म्हात्रे, राजेश ठाकूर यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.








Be First to Comment