खालापूर नगरपंचायतीचा पंधरा लाखाचा निधी
सिटी बेल लाइव्ह / खालापूर (बातमीदार)
जंगलचा राजा अशी उपाधी असलेला आदिवासी समाजाची संस्कृतीचे जतन योग्य रितीने व्हावे या दृष्टीने खालापूर नगरपंचायत हद्दीत ऊभे राहणारे आदिवासी सांस्कृतिक भवन परिपूर्ण होईल यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन खालापूर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा शिवानी जंगम यांनी दिले.
जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने खालापूर येथे सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन पार पङले.यावेळी तहसीलदार इरेश चप्पलवार,खालापूर नगरपंचायत नगराध्यक्षा गुलाब वाघमारे,उपनगराध्यक्षा शिवानी जंगम,मुख्याधिकारी सुरेखा भणगे ,नगरसेवक संतोष जंगम, दिपक नाईक ,रेणूका पवार,मंगल चाळके,राहुल चव्हाण, आदिवासी समाजाचे नेते दिलीप ङाकी सह आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खालापूर नगरपंचायतीने नागरि सुविधा योजने अंतर्गत पंधरा लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे.तालुक्याच्या ठिकाणी सर्व सोयीसुविधानी युक्त आदिवासी सांस्कृतिक भवन ऊभे करण्यासाठी नगरपंचायत पुढाकार घेतल्या बद्दल आदिवासी नेते दिलीप ङाके यानी आभार मानले.दरवर्षी होणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम कोरोनामुळे रद्द करण्यात आले होते.सामाजिक अंतर पालन करत कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल तहसीलदार चप्पलवार यानी आयोजकांचे आभार मानले.






Be First to Comment