पोलादपूरच्या शिवसैनिकांनी केला कर्नाटक सरकारचा निषेध
सिटी बेल लाइव्ह / पोलादपूर (शैलेश पालकर)-
तालुक्यातील शिवसैनिकांनी कर्नाटक राज्यातील छ.शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटविण्याच्या कृत्याचा निषेध म्हणून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील छ.शिवरायांच्या पुतळयासमोर घोषणा देत निषेध केला.
कर्नाटक राज्यातील बेळगाव लगतच्या मनगुत्ती गावातील छ.शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटविण्याची घटना झाल्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात सर्वत्र उमटले. पोलादपूर शहरातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील छ.शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळयाजवळ शिवसेनेचे नगराध्यक्ष राजन पवार, उपनगराध्यक्ष प्रकाश गायकवाड, पोलादपूर तालुकाप्रमुख निलेश अहिरे, शहरप्रमुख सुरेश पवार, उपशहरप्रमुख राजन पाटणकर, ज्ञानेश्वर पार्टे, माजी सरपंच मनोज प्रजापती, युवासेनेचे ॠषिकेश मोरे तसेच अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी यावेळी तब्बल दहा मिनिटांहून अधिक काळ कर्नाटक सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
यावेळी भगवे झेंड फडकवित कर्नाटक सरकारचा निषेध करणाऱ्या शिवसैनिकांनी सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करीत मास्कही परिधान केले होते.






Be First to Comment