सिटी बेल लाइव्ह / कर्जत (संजय गायकवाड)
9 ऑगस्ट क्रांती दिन भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सैनिकांच्या समर्पणाला कर्जत नगरपरिषदेच्या वतीने त्रिवार अभिवादन करण्यात आले.
भारतीय स्वातंत्र्य संग्रामात आत्मार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या आणि कारावास भोगलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ नगरपरिषद हद्दीत आमराई येथे उभारण्यात आलेल्या स्मृतीस्तंभास नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी पुष्पहार अर्पण करून त्रिवार अभिवादन केले.याप्रसंगी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नगरसेवक राहुल डाळींबकर, नगरसेविका प्राची डेरवणकर, नगरपरिषद कर्मचारी सचिन सोनवणे उपस्थित होते.






Be First to Comment