आमडोशी फाटा ते नागोठणे पोयनाड रस्त्याच्या कामास सुरवात
सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :
नागोठणे – रोहा राज्य मार्गावरील आमडोशी फाटा ते वरवठणे मार्गे नागोठणे मार्गावरील रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असल्याने रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून या रस्त्यावरून नागरिकांना चालणेही मुश्किल झाले आहे. या रस्त्यावरील खड्डे येत्या आठ दिवसामध्ये न भरल्यास रस्तामध्ये जेसीबीने चर खोदणार असा इशारा सार्वजनिक बांधकाम खाते अलिबाग यांना सामाजिक कार्यकर्ते भाजपचे माजी जिल्हाउपाध्यक्ष किशोरभाई म्हात्रे यांनी दोन दिवसांपूर्वी सिटी बेल लाइव्हच्या माध्यमातून दिला होता.
शनिवार ८ आॅगस्ट रोजी या रस्त्याच्या कामास सुरवात झाली असल्यामुळे प्रवासी वर्गात आनंदी वातावरण निर्माण झाले असून त्यांनी किशोरभाई म्हात्रे यांचे आभार व्यक्त केले आहेत.






Be First to Comment